सॅमचं खरं नाव काय?, डिसूझा आणि एनसीबी अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप जारी; मलिक यांचा नवा धमाका

| Updated on: Nov 07, 2021 | 1:39 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा नवा धमका केला आहे. सॅम डिसूझा याचं खरं नाव सॅनविल स्टॅनली डिसूझा असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. (nawab malik released audio between senveel stanley dsouza and ncb officer vv singh)

सॅमचं खरं नाव काय?, डिसूझा आणि एनसीबी अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप जारी; मलिक यांचा नवा धमाका
senveel stanley dsouza
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा नवा धमका केला आहे. सॅम डिसूझा याचं खरं नाव सॅनविल स्टॅनली डिसूझा असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच सॅनविलची एनसीबीच्या एका बड्या अधिकाऱ्यासोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही मलिक यांनी जारी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ही ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. सॅनविल आणि एनसीबी अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या संभाषणाची ही क्लिप आहे. त्यात सॅनविल सिंह यांना स्वत:चा परिचय करून देत असल्याचं कळतं. मी सॅनविल बोलतोय, असं सॅनविल बोलताना ऐकू येतं. त्यावर कोण सॅनविल? असा सवाल सिंह करतात. तुम्ही माझ्या घरी नोटीस पाठवलीय ना तोच सॅनविल. तुम्ही नोटीस पाठवल्याचं मला कळलं, असं सॅनविल बोलतो. त्यावर, अच्छा… अच्छा… सॅनविल… कधी येणार आहेस तू, असं सिंह विचारतात. त्यावर मी मुंबईत पोहोचलो नाही. माझी प्रकृती ठिक नाहीये, असं सॅनविल सांगतो.

तू बुधवारी ये… काहीच चालबाजी नको

त्यानंतर, तू कधी येणार आहेस? असं सिंह विचारतात. सोमवारपर्यंत मी येईल, असं तो सांगतो. त्यावर, तू सोमवारी नको, बुधवारी ये. सोमवारी मी नाहीये. तुझा हा फोन घेऊन ये. काहीच चालबाजी नको. ऑल रेडी तुझा आयएमईआयनंबर माझ्याकडे आहे. मी तुला वॉर्न करत आहे, असं सिंह सांगतात. सिंह यांच्या या सक्त ताकीदनंतर मी असं काहीच करणार नाही, असं तो सांगतो. मलिक यांनी ही ऑडिओ क्लिप आणि फोटो ट्विट केला आहे. या व्यक्तीचं नाव सॅम डिसूझा सांगितलं जात आहे. पण तो सॅम डिसूझा नसून सॅनविल स्टेनली डिसूझा आहे, असा दावाही मलिक यांनी केला आहे.

मलिक यांचा धमाका

दरम्यान, मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील आणखी काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. एनसीबीच्या कार्यालयात एक चांडाळ चौकडी आहे. हीच चांडाळ चौकडी सर्व खेळ करत आहे. समीर वानखडे, व्हीव्ही सिंग, आशिष रंजन आणि माने नावाचा ड्रायव्हर यांची चांडाळ चौकडी या प्रकरणात कार्यरत होती. असं सांगतानाच गेल्यावेळी माझ्याकडून एक चुकीची माहिती दिली गेली. व्ही. व्ही. सिंग यांनी माझ्या जावयाकडून रेंज रोव्हर मागितली नव्हती. तर आशिष रंजनने रेंज रोव्हर मागितली होती, असं मलिक म्हणाले.

मोहित कंबोज हा आर्यन खान किडनॅपिंगचा मास्टर माइंड आहे. त्यात सॅम डिसूझाचाही सहभाग आहे. आज ना उद्या ते आतमध्येा जाणारच असंही त्यांनी सांगितलं. माझे आरोप खोटे असल्याचं सांगत समीर वानखेडे आता हसत आहेत. पण नंतर ते रडणार आहेत. सत्यमेव जयते होणारच आहे, असा दावाही त्यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं, पण एका जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीत चढाओढ

मुंबईत मोहित कंबोजच्या मालकीची 12 हॉटेल्स, आसपासची हॉटेल्स बंद पाडण्यासाठी घ्यायचे समीर वानखेडेंची मदत: नवाब मलिक

(nawab malik released audio between senveel stanley dsouza and ncb officer vv singh)