मुंबई: एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय राज्यसरकारने अंतिम निर्णयासाठी राज्यपालांकडे पाठवला असून राज्यपाल त्यावर लवकरात लवकर हस्ताक्षर करतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय राज्यपालांकडे प्रलंबित आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
31 जुलैच्या तीन दिवस अगोदर राज्यसरकारने तीन नांवे निश्चित करून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यावर राज्यपाल हस्ताक्षर करुन प्रस्ताव परत शासनाकडे पाठवतील. त्या नियुक्त्या होऊन एमपीएससीचे कामकाज सुरू होईल, मात्र निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
राज्य शासनाने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय. विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने आपण ती यादी तातडीने मंजूर कराल असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. एका युजर्सने ट्विट करुन, 31 जुलैपूर्वी आपण MPSC आयोगातील रिक्त जागा भरणार होता, त्याचं काय झालं?, असा सवाल विचारला. त्यावर रोहित पवारांनी हे उत्तर दिलं.
ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी 12 आमदारांची यादी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु कित्येक महिने उलटून गेली तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती यादी मंजूर केलेली नाहीय. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी राज्यपालांना चिमटा काढला.
पुण्याच्या स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन महाराष्ट्रात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यी आणि पालकांना दिलासा देण्यासाठी तसंच एमपीएससीचा कारभार गतीमान व्हावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. 31 जुलैपूर्वी आयोगातील सर्व महत्त्वाची पदे भरण्यात येतील, अशी माहिती त्यांनी अधिवेशन काळात विधानसभेत दिली. त्यानुसार 31 जुलैपूर्वीच सदस्यांची यादी राज्य शासनाने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे.
इतर बातम्या
31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार, अजित पवार यांची विधानसभेत मोठी घोषणा
Nawab Malik said MPSC member appointment subject pending at Governor Office