आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया क्रुझवर होता, तो वानखेडेंचा मित्र, त्यानं माल विकला, नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप

| Updated on: Oct 27, 2021 | 10:28 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज एनसीबीच्या क्रुझवरील रेडवर आणखी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत कंभीर आरोप केले आहेत.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया क्रुझवर होता, तो वानखेडेंचा मित्र, त्यानं माल विकला, नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप
समीर वानखेडे नवाब मलिक
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज एनसीबीच्या क्रुझवरील रेडवर आणखी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत कंभीर आरोप केले आहेत. मी पाठवलेल्या पत्राकडं एनसीबीनं दुर्लक्ष करणं चुकीचं असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी क्रुझवर होता, असा आरोप केलाय. ड्रग्ज पाटीर्तील रेडचा खेळ संपला असला तरी आंतरराष्ट्रीय खेळाडू बाहेरचं असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. आंतरराष्ट्रीय माफिया हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कदायक आरोप मलिक यांनी केलाय.

तो आंतरारष्ट्रीय माफिया कोण?

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया दाढीवाला हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही मागवावी. त्याची प्रेमिका बंदूकीसह क्रूझवर होती. एका व्हिडीओत ती डान्स करताना दिसून येत आहे. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल असं नवाब मलिक म्हणाले. समीर वानखेडे यांच्या मालदीव दौऱ्याची चौकशी व्हावी, असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय.

मला काल एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या निनावी पत्र मिळालं, पहिल्यांदा म्हटले याची दखल घेऊ, नंतर मी हे पत्र एनसीबी डीजींना पत्र पाठवलं. आरोपांकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे, कारण आरोप खूपच गंभीर आहेत. मला वाटतं एवढी मोठी इनव्हिस्टिगेश एजन्सी आहे, आमच्यापुढेही जाऊन चार पावलं काम करेल, अशी अपेक्षा होती, असं नवाब मलिक म्हणाले. निनावी पत्राची दखल घ्यायलाच हवी, ज्या विषयावरुन मी आरोप करतोय, त्याकडेही एनसीबीने दुर्लक्ष करु नये, असं नवाब मलिक म्हणाले.

सीडीआर तपासा?

समीर वानखेडे, वानखेडेंचे चालक आणि प्रभाकर साईल यांचा सीडीआर तपासावा, अशी मागणी नवाब मलिक एनसीबीकडे केली. आता एनसीबीने पावलं उचलावीत, अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय. प्रभाकरने व्हिडीओद्वारे सगळा घटनाक्रम समोर आणलाय,
या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे. क्रूझ पार्टीची पोलिसांकडून परवानगी घेतली नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

…तर मी मंत्रिपद सोडेन, समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांची जाहीर भूमिका अन् खुलं आव्हान!

गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार, गदारोळ होताच म्हणाले, ‘कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला, पास नव्हते!’

Nawab Malik said on the time of party on cruise international drugs peddler present their but he not arrested and he is friend of Sameer Wankhede