मुंबई: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on ED) वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापेमारी झाल्याची माहिती देण्यात आली मात्र, सात ठिकाणी काही व्यक्तींच्या घरी कारवाई करण्यात आली अशी माहिती आहे, असं म्हटलं. नवाब मलिक यांनी यासंदर्भात प्रेस घेत माहिती दिली.वक्फ बोर्डाच्या वतीनं 7 एफआयर दाखल करण्यात आल्या होत्या. वक्फ बोर्डाच्या 30 हजार संलग्नित संस्थांची चौकशी करण्याची मागणी करतो, असं नवाब मलिक म्हणाले.
पुण्यातील ट्रस्ट आहे ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट, तालुका मुळशी जिल्हा पुणे हे वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहे. हा ट्रस्ट 19 मे 2009 धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून वक्फ बोर्डाकडे वर्ग झाला.लोकशाही आघाडीचं सरकार बनल्यानंतर वक्फ कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर धर्मादाय आयुक्ताकडे असलेल्या संस्थांचं डीम्ड रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री होतो आणि आम्ही वक्फ बोर्ड कायदा 1995 ला लागू केला, असं नवाब मलिक म्हणाले.
काही माध्यमांनी बातम्या चालवल्या की नवाब मलिक यांच्या घरापर्यंत ईडी पोहोचणार अशा बातम्या चालवल्या. मात्र, कारवाई ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट संदर्भात कारवाई होत आहे. ज्यामध्ये पुण्यात एमआयडीसीत पुण्यात 5 हेक्टर 51 आर जमीन अधिग्रहित करुन जमीन भूसंपादन अधिकाऱ्याकडे जमा करण्यात आली. भूसंपदान अधिकाऱ्यानं इम्तियाज हुसेन आणि इतर ट्रस्टी जे स्वत:ला क्लेम करत होते. त्यांना सात कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपये त्यांना भूसंपदानाची रक्कम देण्यात आली. मात्र, माझ्याकडे जी कागदपत्र आहेत त्यानुसार 9 कोटी 64 लाख 42 हजार 500 रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपदानाचे जमा झाले होते. बनावट कागदपत्र तयार करुन सात कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग करण्याचा प्रयत्न 2020 मध्ये केला.
वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर जी एनओसी त्यांनी दाखल केलेली आहे. जे आमचे सीईओ आहेत अनिष शेख यांनी पुणे विभागाचे अधिकारी खुसरु यांच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2021 पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात एफआय़र नोंदवला. पाच लोकांना अटक झाली, पहिलं नाव चांद रमजान मुलाणी, इम्तियाज मुहमद हुसेन शेख, कलीम सय्यद, राजगुरु आणि कांबळे नावाच्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली. खुसरु ऑगस्टमध्ये पोलीस ठाण्यात गेले तेव्हा तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना फोन केला त्यानंतर गुन्हा नोंद झाला.
मी अल्पसंख्यांक विभागाचा चार्ज घेतल्यानंतर मी वक्फ बोर्डाचा मिनिस्टर आहे.वक्फ बोर्डाकडे तक्रार आल्यास चौकशी करु, असं नवाब मलिक म्हणाले. वक्फ बोर्डात आता 10 सदस्य आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पूर्ण क्षमतेनं वक्फ बोर्ड बनलं आहे. 26 तारखेला चेअरमनची निवडणूक जारी करण्यात आली आहे. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात वक्फ बोर्डात कायम सीईओ नेमण्यात आला.
सातत्यानं आमच्याकडं तक्रारी येत होत्या. त्या तक्रारी मी सीईओंकडे पाठवल्या, त्यांना काही तक्रारी मिळत होत्या. वक्फ बोर्डानं 7 तक्रारी दाखल केल्या आहेत, असं नवाब मलिक म्हणाले. ताबूत एंडोमेंट ट्रस्ट पुणे, जुम्मा मस्जिद, बदलापूर ठाणे, दर्गा मस्जिद आष्टी बीड, मस्जिद देवी निमगाव तालुका आष्टी बीड, दुर्गा बुराणशाह ईदगाह जिंतूर रोड परभणी, मस्जिद छोटा पंचतन परतपूर जिल्हा जालना, दर्गा नुरुल खुदा मस्जिद कबरस्तान दिल्ली गेट औरंगाबाद या सात एफआयर नोंदवलं आहे. आष्टीच्या प्रकरणात एक उपजिल्हाधिकारी शेळके याला देखील अटक झाली आहे.
हा विभाग माझ्याकडे आल्यावर वक्फ बोर्डात क्लिन अप कार्यक्रम सुरु केला आहे. क्लिन अपमध्ये सरकारी अधिकारी आणि जुने पदाधिकारी यांना काढलं जाऊ शकतं. वक्फ बोर्डाची मीटिंग सात सात महिने होत नव्हती. वक्फ बोर्डाचं कामकाज ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे. डिजीटल पद्धतीनं बोर्डाचं कामकाज पारदर्शक व्हावं, असं नवाब मलिक म्हणाले. ईडी आली आहे त्याचं स्वागत आहे. वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या 30 हजार संस्थांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
आमच्या क्लिन अप अभियानात ईडीचं सहकार्य मिळतंय याचं स्वागत करतो. लखनऊ शिया बोर्डासाठी शिया समुदायानं पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. ते प्रकरण सीबीआयला दिलं होतं. वसीम राझा यांची चौकशी करावी, असं मलिक म्हणाले. मात्र, ईडी वक्फ बोर्डात घुसली नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या अशा बातम्या चालवण्यात आल्या, असं नवाब मलिक म्हणाले. ईडीला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, बदनामी करण्याचा डाव असल्यास ते चूक करत आहेत. हेतू प्रामाणिक असेल तर आम्ही सहकार्य करु, असं नवाब मलिक म्हणाले. बातम्या पेरून माझी प्रतिमा मलीन करु शकत नाही, असं नवाब मलिक म्हणाले.
इतर बातम्या:
अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’
Nawab Malik welcomes ED raids regarding Waqf Boards demanded checking record of thirty thousand trust