मुंबई : 2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचा माझा कयास आहे. त्या घटनेमुळे राष्ट्रपती राजवट जाऊन नवं सरकार सहज स्थापन झालं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काही दिवसांपुर्वी म्हणाले होते. त्यावर टीव्ही ९ मराठी आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, की त्या विषयाला जास्त महत्व दिले गेले. तुम्ही त्या विषयाला महत्व देऊ नका. अजून मला या विषयावर काही बोलायचे नाही. या विषयावर आता पडदा पडला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्यापासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीला सुरुवात होतेय. राज्यातील जनतेचं या महाखटल्याकडे लक्ष लागलेलं आहे. राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी येत्या काही दिवसात पूर्ण होईल. कायद्यानुसार निकाल दिला गेला तर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार बेकायदेशीर असल्याचं सिद्ध होईल. त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुका होतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
विश्वसात घेतले असते तर
शांत असणाऱ्या जयंतराव यांना सभागृहात संताप आला, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की. अध्यक्ष ऐकत नसतील तर संताप येतो. भास्कर जाधव यांचा भाषण होऊ द्यावे, हीच मागणी आम्ही केली होती. परंतु ते पुर्ण झाली नाही. निर्लज्ज हा शब्द वापरा होता. आता तो असंसदीय असेल तर त्याला पर्याय शोधावा लागेल.
महाविकास आघाडीने एकत्र येऊन नाना पटोले यांना अध्यक्ष केले होते. परंतु त्यांनी विश्वासात न घेता राजीनामा दिला. ते अध्यक्ष असते तर महाविकास आघाडीचे सरकार राहिले असते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता का? या आरोपवर जयंत पाटील म्हणाले की, त्यांनी कोणता गुन्हा केला होता, कोणत्या गुन्ह्यात त्यांना तुरुंगात टाकायचे होते, हे मला माहीत नव्हते. या विषयावर आमचे बोलणे झाले नाही. आमच्या समोर अशी चर्चा झाली नाही.
निधी सर्वांना दिला
सरकार पडण्याचा दोष राष्ट्रवादीला दिला जातो,कारण राष्ट्रवादीकडून आमदारांना निधी दिला गेला नाही, या आरोपावर जयंत पाटील म्हणाले की, जे गेले ते का गेले याचा राज्यात सुरस कथा पसरल्या आहेत. कोणत्याही आमदारांना निधी कमी मिळाला नाही. कोरोनामुळे विकास कामे कमी झाली. त्यामुळे निधी कमी गेला.