‘सरको…बहुत जगह हैं!’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, राष्ट्रवादीकडून मिश्किल व्हिडीओ ट्विट

| Updated on: Jan 17, 2024 | 3:30 PM

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक मजेशीर व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दाटीवाटीने एका गाडीत बसताना दिसत आहेत.

सरको...बहुत जगह हैं!, दोघात तिसरा आता सगळं विसरा, राष्ट्रवादीकडून मिश्किल व्हिडीओ ट्विट
Follow us on

मुंबई | 17 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवरुन सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे. “जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी”, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला नेटीझन्सकडून तसेच वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. विरोधकांकडून टीका केल्या जाणाऱ्या या व्हिडीओ नेमकं आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आम्ही त्याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

संबंधित व्हिडीओ नेमका कुठला आहे, म्हणजे ठिकणा नेमकं कुठलं आहे ते समोर आलेलं नाही. पण व्हिडीओतील घडामोडी पाहता हा व्हिडीओ कदाचित सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानंतरचा असू शकतो. राज्य सरकारकडून राज्यभरात ठिकठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला जातोय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते हजर राहत आहेत. तसेच इतर खात्यांचे मंत्री आणि काही महत्त्वाचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. त्यामुळे कदाचित संबंधित व्हिडीओ हा शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळचा असावा, असा अंदाज बांधला जात आहे.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

या व्हिडीओत विरोधकांना मजेशीर वाटेल असं काय आहे? असं तुम्हाला वाटत असेल. विरोधकांना मजेशीर वाटण्यामागील कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या व्हिडीओत एका एसयूव्ही गाडीत कदाचित ड्रायव्हर तो व्हिडीओ बनवत असल्याचं निदर्शनास येत आहे. ड्रायव्हरच्या बाजूला सीटवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसत आहेत. ते सर्व नागरिकांना हात देऊन आपल्या जागेवर बसत आहेत. तर पाठिमागे एका खिडकीच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले आहेत. त्यांच्याबाजूला सीटच्या मध्यभागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसले आहेत, त्यानंतर त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले आहेत.

इथपर्यंत ठिक होतं, पण याच गाडीत मंत्री गिरीश महाजन हे देखील मागच्या सीटमध्ये अजित पवारांच्या बाजूला बसण्याचा प्रयत्न करतात. खरंतर पाठीमागे तीन जणांना बसायची जागा असते, पण गिरीश महाजन तिथे बसल्याने चारही नेते अतिशय दाटीवाटीने बसताना दिसत आहेत. याच दाटीवाटीवर विरोधकांकडून खिल्ली उडवली जात आहे. विरोधकांकडून संबंधित व्हिडीओ तुफान व्हायरल केला जातोय.