मुंबई, | दि. 1 मार्च 2024 : 2019 चा स्पष्ट कौल भाजप आणि शिवसेना युतीला जनतेने दिला होता. त्यावेळी भाजपला १०६ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. सत्तेच्या राजकारणामुळे भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीचे सरकार पाहत आहोत. मग तो कौल का नाकारला गेला, हा वेगळा मुद्दा आहे. परंतु जनतेचा कौल नाकारुन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांना शरद पवार यांनी पाठवले होते की ते स्वत: गेले होते. त्या प्रश्नाचे उत्तर काळाच्या ओघात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष नाही. मी अधिकृत राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक उलथापालथी झाली. आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून बहुजनांच्या हितासाठी भाजपसोबत गेलो. पण वेगळं काही तरी घडलं हे दाखवण्याचा राज्यात प्रयत्न होत आहे. २०१४चे निकाल हाती येत होते. भाजप मोठा पक्ष झाला होता. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलेले होते. त्यावेळी आम्ही भाजपने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही आज भाजपसोबत गेलो ते अचानक गेलो असं नाही. त्याची सुरुवात २०१४पासून झाली. परंतु ४३ आमदार अजितदादांसोबत येतात हे कर्तृत्व आहे. त्यांचावर विश्वास आहे म्हणूनच आहे. त्यांनी असामान्य भूमिका घेतली म्हणूनच त्यांच्यासोबत गेले.
२०१४पासून भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा पक्षनेतृत्वाचा होता. तो अजितदादांचा नव्हता. नंतर निर्णय बदलला. नाही तर आम्ही त्या सरकारमध्ये गेलो असतो. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. राष्ट्रवादीत संघर्ष नव्हताच. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. तो केवळ २०१४लाच नव्हे तर २०१६लाही तोच निर्णय झाला होता. मी पक्षातील नेते, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील होते. खाती ठरली होती. पालकमंत्रीपद ठरलं होतं. पण काही कारणाने ते ठरू शकलं नाही