फक्त तीन ओळीचं निवेदन… शरद पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रस्तावात काय म्हटलं? प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती

| Updated on: May 05, 2023 | 12:10 PM

2 मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा आम्हाला अनपेक्षित होती. असं काही होईल हे वाटलं नव्हतं.

फक्त तीन ओळीचं निवेदन... शरद पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रस्तावात काय म्हटलं? प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती
praful patel
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळून लावण्यात आला. तसेच शरद पवार हेच अध्यक्ष राहतील असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधत फक्त तीन ओळीचं निवेदन सादर केलं. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असं पटेल यांनी जाहीर केलं. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.

TV9 Marathi Live | Maharashtra Politics | NCP Sharad Pawar Resign | Ajit Pawar | CM Eknath Shinde |

निवड समितीच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या घडामोडींची माहिती दिली. 2 मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा आम्हाला अनपेक्षित होती. असं काही होईल हे वाटलं नव्हतं. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही आश्चर्यचकीत झालो. त्यानंतर आम्ही सर्वांनीच त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनीही आग्रह धरला, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पवारांची देशाला गरज

त्यानंतर एक समिती नेमण्यात आली. शरद पवार यांचा राजीनामा मागे घेण्यासाठी ही निवड समिती होती. आम्ही त्यानंतरही पवार यांना भेटून राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती केली. देशभरातील नेत्यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून गळ घातली. पंजाबला प्रकाश सिंग बादल यांच्या अंत्यसंस्काराला गेलो होतो, तिथेही अनेक नेत्यांनी शरद पवार यांची देशाला गरज असल्याचं मत व्यक्त केलं. पवार साहेबांसारखा नेता देशात नसल्याचं सर्वांनीच सांगितलं.

ncp

पवार साहेबांनी या सक्रिय पदावरून जाऊ नये असं मत व्यक्त केलं. गेल्या दोन ते तीन दिवसापासून कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना सर्वांनी पाहिल्या आहेत, असं पटेल यांनी सांगितलं. सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात वेदना, दु:ख आणि नाराजी आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पवारांना भेटणार

शरद पवार यांनी आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतला. पण समितीने बैठक आज बोलावली. बाहेरच्या राज्यातील नेतेही या समितीत आहेत. त्यामुळे त्यांना येण्यासाठी ही बैठक थोडी लांबली. आज बैठक झाली. त्यात एक ठराव मंजूर केला आहे. सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव घेऊन आम्ही पवारांना परत अध्यक्षपदी राहण्याची विनंती करणार आहोत.

ठराव काय आहे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. हा राजीनामा एकमताने नामंजूर करून त्यांनाच अध्यक्ष म्हणून एकमताने निवडण्यात येत आहे.