मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी नवी ॲमनिस्टी स्कीम; जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत घोषणा

| Updated on: Mar 08, 2022 | 3:48 PM

मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी ॲमिनिटी स्कीम सरकारकडून तयार करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजूरीसाठी ही फाईल गेली आहे. येत्या दोन दिवसात या बाबत निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली.

मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी नवी ॲमनिस्टी स्कीम; जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत घोषणा
जितेंद्र आव्हाड
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी (slums) ॲमनेस्टी स्कीम सरकारकडून तयार करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजूरीसाठी ही फाईल गेली आहे. येत्या दोन दिवसात या बाबत निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( jitendra awhad) यांनी विधानसभेत दिली. कुर्ला पश्चिम येथील प्रिमियम कंपनीच्या जागेवरील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थितीत करण्यात आला होता. या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना भाजपा आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी मुंबईतील अशा रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली. जितेंद्र आव्हाड यांच्या या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या 40% हुन अधिक योजना अशाच रखडल्या आहेत. यातील बिल्डर ईडी, पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा यांच्या विविध चौकशांमध्ये अडकले आहेत. काहीजण कारागृहात आहेत. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांची ससेहोलपट सुरु आहे. मूळ घर तोडले गेले, बिल्डरकडून दोन वर्षांनंतर पुढचे भाडे मिळणे बंद झाले, त्यामुळे त्यांना आता कोणी वाली उरलेला नाही. अशावेळी सरकारने याबाबत काहीतरी योजना तयार करुन अशा झोपडपट्टीधारकांना भाडे कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच पुनर्वसनाचे घर त्यांना मिळावे यासाठी सरकार काय प्रयत्न करणार?, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.

दोन दिवसात निर्णय

शेलार यांच्या या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर उत्तर देताना ही घोषणा केली. या रहिवाशांना ॲमनेस्टी स्कीम तयार करण्यात आल्याचे सांगत या योजनेचा फायदा 523 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना होईल, असे आव्हाड यांनी सांगितले. ही फाईल गृहनिर्माण विभागाकडून मुख्य सचिवांकडे आणि तिथून मंजूर होऊन मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजूरीसाठी गेली आहे. येत्या दोन दिवसात त्यावर स्वाक्षरी होणे अपेक्षित असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

#झुकेगा नही साला… 27 कोटींच्या फसवणुकीचे आरोप असलेल्या सुरेश धस यांचे सोशल कँपेन, मैं हू डॉन वर तुफान ढोलबाजी!

VIDEO: नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही, दाऊदचा दबाव होता का?, मोर्चा तर होणारच: चंद्रकांत पाटील

Maharashtra News Live Update : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह शिंदे