मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आजच्या पुणे दौऱ्यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा आता प्रचंड वाढला आहे. राजकीय टीका टिप्पणी चालू असतानाच पुण्यातील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गाडीवर एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चप्पल भिरकावल्यानंतर राष्ट्रवादी पक्षासह नेत्यांवर जोरदार टीका करण्यात आली. यामध्ये प्रखर टीका करण्यात आली ती भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी. राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेनेवर टीका करत देवेंद्र फडणवीस यांचे मोठेपणही त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितले आहे.
यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका करत असताना ज्या मंत्र्याचे अंडरवर्ल्डचा दाऊदबरोबर संबंध असतील तर तुम्ही आम्ही कसं जगायचं सांगा म्हणून सवालही उपस्थित केला आहे.
यावेळी त्यांनी हिंदुह्रदयसम्राट यावरुनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘खरं म्हटले तर आपण काही लोकं हिंदुह्रदयसम्राट असल्याचे बॅनरसहित फोटो लावतात. पण तुम्ही माझी भावना विचारली तर खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे. कारण त्या एका पत्रकार परिषदेनंतर राष्ट्र आणि राज्य वाचवायचे काम केलंय. अहो आपण ज्या राज्यामध्ये फिरतोय, ज्या मुंबईमध्ये राहतोय, तुम्ही तर ज्या मतदार संघात मतदान करताय, राहताय, जगताय तिकडचाच आमदार मंत्री म्हणून जर अंडरवर्ल्डचा दाऊद, त्याच्या सगळ्या लोकांबरोबर व्यवहार करत असेल त्याचे पैसे ठेवत असेल त्याच्या पैशामुळे प्रॉपर्टी घेत असेल आणि त्या प्रॉपर्टीच्या पैसे घेतल्यानंतर मुंबईतून बॉम्ब ब्लास्ट होत असतील तर आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार तुम्ही सांगा मला?
नितेश राणे यांनी असे प्रश्न उपस्थित करुन हिंदुह्रदयसम्राट यावरुन आता शिवसेनेला त्यांनी छेडले आहे. त्यामुळे हिंदुह्रदयसम्राटचा वाद विकोपाला जाणार का हे आता येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
हिंदुह्रदयसम्राट ही पदवी देवेंद्र फडणवीस यांना का द्यायची याबद्दल त्यांनी त्यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी राष्ट्र, राज्य वाचवल्याचे सांगत आताच्या काळात तेच खरे हिंदुह्रदयसम्राट असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
हिंदुह्रदयसम्राट या पदवीविषयी बोलताना त्यांनी मंत्री आणि सध्या अटकेत असलेले नवाब मलिक यांच्यावरही गंभीर आरोप केले. नवाब मलिक यांच्यावर आरोप करताना त्यांनी त्यांचा आणि दाऊदचा थेट संबंध असल्याचे सांगत आमदार, मंत्री यांचे संबंध जर अंडरवर्ल्डशी असतील तर आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार तुम्ही सांगा मला? असा सवालही त्यांनी बोलताना उपस्थित केला.
संबंधित बातम्या
धारावी पुनर्वसन प्रकल्पातील 800 कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी
नारायण राणेंना BMC ची कारणे दाखवा नोटीस,अधिश बंगला प्रकरणी 7 दिवसांत खुलासा मागवला