Nitesh Rane : नवाब मलिक यांच्या पैहचान कौनच्या ट्विटला आता नितेश राणेंकडून प्रत्युत्तर; पॉलिटिकल ट्विटर वॉर सुरु

| Updated on: Dec 25, 2021 | 9:27 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल पैहचान कोन? असं कॅप्शन लिहिलेल्या ट्विटसह एक कॉकटेल फोटो ट्विट केला होता. आता नवाब मलिकांच्या टीकेला नितेश राणे यांनी देखील ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं आहे.

Nitesh Rane : नवाब मलिक यांच्या पैहचान कौनच्या ट्विटला आता नितेश राणेंकडून प्रत्युत्तर; पॉलिटिकल ट्विटर वॉर सुरु
नवाब मलिक, नितेश राणे
Follow us on

मुंबई: महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यटन पर्यावरण विकास मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे सभागृहात जात असताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्यॉव म्यॉव आवाज करत आदित्य ठाकरे यांना डिवचलंय होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल पैहचान कोन? असं कॅप्शन लिहिलेल्या ट्विटसह एक कॉकटेल फोटो ट्विट केला होता. आता नवाब मलिकांच्या टीकेला नितेश राणे यांनी देखील ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं आहे.

आता नितेश राणे यांच्याकडून प्रत्युत्तर

नितेश राणे यांनी देखील नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर आहे. नितेश राणे यांच्याकडून देखील नवाब मलिक यांच्या प्रमाणं एक फोटो ट्विट करत त्याला कॅप्शन दिलं आहे. “ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण?”, अशा ओळी नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोसोबत लिहिल्या आहेत.

पैहचान कौन? नवाब मलिकांकडून खास फोटो ट्वीट

नितेश राणेंनी आदित्य ठाकरे विधानभवनात जात असताना केलेल्या कृतीला आता महाविकास आघाडीकडून नवाब मलिक यांच्याद्वारे उत्तर देण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधला. या फोटोकडे निट पाहिलं तर शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पैहचान कौन? असा खोचक सवालही केला होता.

वादाला सुरुवात कशी?

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ… अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. नितेश राणे वारंवार या घोषणा देऊन स्वत:ही हसत होते. त्यांच्या घोषणांवर भाजपचे नेतेही हसत होते.

इतर बातम्या:

नवाब मलिकांकडून नितेश राणेंची खिल्ली, राणेंच्या ‘म्यॉव म्यॉव’ला फक्त एका फोटोने उत्तर

rane vs thackeray : नियम सगळ्यांना एकच, लक्षात असू दे…नक्कलीवरून नितेश राणेंचा पुन्हा इशारा

Nitesh Rane gave answer to Nawab Malik tweet connection with in Aaditya Thackeray Nitesh Rane issue