मुंबईः पंतप्रधान (Prime Minister) हे देशाचे असतात. मात्र, गेल्या 8 वर्षांत भाजप सरकार आल्यापासून आपण पाहतोय की, पंतप्रधान हे भाजपचे (BJP) असल्यासारख वागतात. त्यांचे काम 24 तास राजकारण असेच आहे. देशात धार्मिक गोष्टी सुरू असताना पंतप्रधान का बोलत नाहीत. पेट्रोल – डिझेल दरवाढीवर का बोलत नाहीत, असा तिखट प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले (Nana Patole) यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. पटोले म्हणाले की, त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. संविधानानुसार राज्य चालते. कायद्यानुसार चालते. यूपीचे उदाहरण इथे देण्याची गरज नाही. सगळ्यांना मोठे करायचे काम काँग्रेसने केले आहे. जे लोक सत्तेच्या बाहेर आहेत ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मतभेद आहेत असे भासवण्याचा प्रयत्न करतात. आशिष शेलार यांनी गौप्यस्फोट केलाय, त्यावर आम्ही बोलण्याची काही गरज नाही. मात्र, ज्या प्रकारे तमाशा बनवला जातोय, धार्मिक वाद बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते अगदी चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा न होता या गोष्टीकडे लक्ष दिले जाते आहे. केंद्र प्रत्येक विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा डाव आहे. राज्यात धार्मिक दंगे घडवण्याचा प्रयत्न जसे दिल्लीत झाले, तसे हे कोण करण्याचा प्रयत्न करते आहे, हे आम्हाला माहिती आहे. गृहमंत्र्यांनी अलर्ट दिलेला आहे. त्यानुसार राज्य सरकार काम करत आहे.
अजित पवार म्हणाले की, पेट्रोल-डिझेल दर कपातीचा निर्णय आज होणार नाही. आर्थिक बोजाचा विचार करावा लागेल. केंद्र सरकारला महाराष्ट्र सर्वाधिक टॅक्स देतो. त्यामुळे इंधनावरील राज्य आणि केंद्राची कर मर्यादा ठरवावी लागेल. केंद्राकडून जीएसटीचे पैसे यायचे बाकी आहेत. ते पैसे लवकर येतील असा अंदाज आहे. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत इंधन कपातीचा विषय नाही.जीएसटीचे पैसे अजून केंद्राकडून येणे बाकी आहेत. ते पुढच्या दोन – तीन महिन्यांत येतील असा अंदाज आहे. आम्ही अर्थसंकल्पात कोणताही नवा टॅक्स आम्ही लावलेला नाही. गॅसचा टॅक्स कमी केलाय. त्यामुळे एक हजार कोटीचा टॅक्स येणं बंद झालंय, म्हणजे एक हजार कोटीचा दिलासा सरकारनं राज्यातील लोकांना दिलाय.