मुंबई : गेल्या काही वर्षांपासून स्टील (Steel), सिमेंट (Cement) व इतर बांधकाम साहित्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच मेट्रो सेसचा (metro cess) आधिभार आल्याने बांधकाम व्यावसायिकांना इमारती बांधणे देखील परवडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घरांच्या किमतीत आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घराच्या किमती वाढल्यास सामान्यासांठी मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये स्वत:चे घर घेणे आवाक्याबाहेर जाणार आहे. बांधकाम साहित्यामध्ये स्टील, सिमेंट, विटा वाळू आणि वॉश सॅण्ड अशा जवळपास सर्वच कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत, तर दुसरीकडे मेट्रो सेसचा आधिभार लागल्याने बांधकाम व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. आता घरे पूर्वीच्या किमतीमध्ये विकणे परवडत नसून, घरांच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या क्रेडाईचे अध्यक्ष सुनील फरडे यांनी सांगितले की, एकीकडे बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर तर वाढतच आहेत. मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये मजुरीत देखील प्रचंड वाढ झाली आहे. बांधकाम मजुरांच्या मजुरीत सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये घरे पूर्वीच्या किमतीत विकणे कसे परवडणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये जागेचे भाव देखील अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. त्यामुळे घरांच्या किमतीमध्ये दरवाढ अटळ मानली जात आहे.
रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. पुरवठा साखळी खंडित झाल्याने त्याचा परिणाम हा आयात निर्यातीवर होताना दिसून येत आहे. सर्वच प्रकारच्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने देशांतर्गंत महागाईमध्ये येत्या काळात दहा ते पंधरा टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई वाढल्यास सर्वसामान्याचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
Todays Gold-Silver Rate: सोन्या, चांदीच्या घसरणीला ब्रेक, मौल्यवान धातुचे दर स्थिर
Inflation : कच्च्या तेलाच्या दराला आग, दैनंदिन वस्तूंचे भाव वाढण्याची चिन्ह, आणखी काय काय महागणार?