मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता राज्यात शिवभोजन थाळी पार्सल देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. (now shiv bhojan thali will get parcel, says chhagan bhujbal)
‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश आज दिले आहेत. कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
किंमत तीच, बदल नाही
सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच 5 रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
नियमांचे पालन करा
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने “ब्रेक दि चेन” या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांच सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केलं.
काल 47 हजार नवे रुग्ण सापडले
राज्यात सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. सोमवारी राज्यात 47 हजार 288 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 26 हजार 252 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.36 टक्के झालं आहे. राज्यात काल मृत्यूच्या संख्येतही काही दिलासा मिळाला आहे. काल दिवसभरात 155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सोमवारी हिच संख्या 222 वर होती. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.83 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 24 लाख 16 हजार 981 व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. तर 20 हजार 115 वक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 4 लाख 51 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोणत्या शहरात चिंताजनक स्थिती? (अॅक्टिव्ह रुग्णसंख्या)
पुणे – 81 हजार 378
मुंबई – 73 हजार 281
ठाणे – 57 हजार 635
नागपूर – 55 हजार 926
नाशिक – 34 हजार ५४०
औरंगाबाद – 16 हजार 818
अहमदनगर – 17 हजार 716 (now shiv bhojan thali will get parcel, says chhagan bhujbal)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 6 April 2021 https://t.co/KiziFo68rW | #SuperFastNews | #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2021
संबंधित बातम्या:
“फडणवीस आणि राज ठाकरेंकडून सहकार्याच्या आश्वासनानंतरच मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन जाहीर”
(now shiv bhojan thali will get parcel, says chhagan bhujbal)