मुंबईः ओमिक्रॉनचे 30 संशयित मुंबई आढळल्यानंतर महापालिकेने (BMC) तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. हाय रिस्क असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. विदेशातून येणाऱ्यांसाठी हा पंचसूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. आज याची माहिती मुंबईच्या महापौर किशोऱी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
– बीएमसीच्या वॉर्डांपर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांची लीस्ट पाठवली जाईल. हे नागरिक क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करत आहेत का, यावर देखरेख ठेवली जाईल.
– वॉर रुमच्या सर्व वॉर्डमध्ये 10 अँब्युलन्स तयार राहतील.
– महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या टीम असतील. यात प्रवाशांच्या घरी जाऊन नियमांचे पालन करण्यासंबंधी चौकशी आणि तपासणी होईल.
– प्रवाशांच्या हौसिंग सोसायट्यांनाही पत्र पाठवले जाईल. त्यांनाही सदर सूचना दिल्या जाील.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, कोणत्याही सोसायटीत बाहेरील कुणी व्यक्ती आल्यास, त्यावर नजर ठेवावी. त्या व्यक्तीने क्वारंटाइनच्या सर्व नियमांचे पालन करावे. सध्या मुंबई ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण असा रुग्ण यापुढे आढळला तर धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोरोना नियमांचे कठोरतेने पालन करणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतुकीसाठी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी मिळेल, असे आदेश दिले होते. अशा ठिकाणी लस न घेतलेली व्यक्ती आढळल्यास संबंधित संस्थेकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, बीएमसीकडे सध्या लसींचा पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
इतर बातम्या-