मुंबई- राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठीच्या भेटीनंतर आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे हे दिल्लीहून विमानाने पुण्यात दाखल झाले. पुण्याहून ते बायरोड पंढरपूरच्या (Pandharpur)दिशेने निघाले आहेत. रविवारी पहाटे आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा करण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या एका मेळाव्यालाही मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा हा एकूण दौरा कसा असेल त्याच्यावर एक नजर टाकूयात
रात्री ९.३० – पुणे विमानतळावरुन पंढरपूरकडे रवाना
रात्री ९.४५ – हडपसरमध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्कार
रात्री ११.३० – पंढरपुरात शासकीय विश्रागमृहात होणार दाखल
पहाटे २ – विठ्ठलाच्या महापूजेसाठी रवाना होणार
पहाटे २.३० – विठ्ठलाची सपत्नीक महापूजा
पहाटे ०५.३० – इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन
पहाटे ५.४५ – नदीघाटाचे लोकार्पण
सकाळी ६.४५ – शासकीय विश्रागृहात आगमन
सकाळी ११.१५ – सुंदर माझे कार्यालय स्पर्धेचे बक्षीस वितरण
सकाळी ११.४५ – स्वच्छता दिंडी कार्यक्रम समारोप
दुपारी १२.३० – शिवसेना मेळाव्यास उपस्थिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदाच विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळतो आहे. थपथविधी झाल्यानंतर त्यांनी आषाढी एकादशीला महापूजेचा मान आपल्याला मिळणार असल्याचं सांगत, हा आपला सन्मान असल्याचे सांगितले होते. पंढरपुरात वारकरी आणि आषाढी एकादशीच्या तयारीचा त्यांनी आढावाही घेतला होता. गणपतीप्रमाणेच आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफची घोषणाही त्यांनी केली होती. मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द सुरु होतानाच त्यांना पहिल्यांदाच विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला आहे. पंढरपुरातील नव्या प्रकल्पांसाठी ते उद्या काय घोषणा करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तसेच आषाढीच्या दौऱ्यानंतरच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.