मुंबई : वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले (Rahul Ghule) हे दिल्लीमध्ये कायमस्वरुपी शिफ्ट होणार आहेत. राज्यातील काही राजकीय एजंटमुळे जीवाला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपल्या आई-वडील तसेच दोन मुलं आणि पत्नीसह ते दिल्लीला स्थायिक होणार आहेत. जिवाला धोका असल्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे मदतीची मागणीसुद्धा केली आहे. तसेच याबाबत आगामी काळात लवकरच खुलासा करेण असंही त्यांनी म्हटलं आहे. घुले यांच्या या ट्विट्समुळे मुंबई तसेच उपनगरांत एकच खळबळ उडाली आहे. (One rupee clinic founder Rahul Ghule claims that his life is in danger will permanently shift to Delhi)
राहुल घुले हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. या क्लिनिकच्या माध्यमातून ते फक्त एका रुपयात रुग्णांवर उपचार करतात. मात्र, त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी “माझ्या जिवाला धोका असून मी उद्या (14 जून) माझे ट्विटर अकाऊंट डिलीट करणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल अभार,” असे ट्विट केले आहे.
राहुल घुले यांनी आपल्या ट्विटमध्ये काही खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत “माझी पत्नी भीतीमुळे रडत आहे. तुमच्या प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे. पण काही राजकीय एजंटमुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मी मुंबईहून दिल्लीत कायमस्वरुपी शिफ्ट होणार आहे,” असे सांगितले आहे.
Dear all friends know or unknown, I’m deleting my Twitter account permanently tomorrow
Thank you for all your love to meWish you all good health
Connect me 98199 31418 if amy problem
My wife was crying due to fear— Dr Rahul Ghule (@DrRahulGhule11) June 13, 2021
We are very small people
I don’t want to be ssr again pic.twitter.com/7t7Qqfyjbn— Dr Rahul Ghule (@DrRahulGhule11) June 13, 2021
राहुल घुले हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. ते रुग्णांकडून फक्त एक रुपया फी घेऊन उपचार करतात. घुले यांनी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर या क्लिनिकची सुरुवात केली होती. सध्याच्या कोरोना काळातही ते अव्याहतपणे काम करत असून त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण आठ कोविड सेंटर चालवले. या कोविड सेंटरमध्ये एकूण 2500 पेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत.
दरम्यान, घुले यांनी काही राजकीय एजंटमुळे माझ्या जिवाला धोका असल्याचे सांगितले असले तरी हे एजंट नेमके कोण आहेत, याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही.
इतर बातम्या :
“प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी”
बेकरीच्या आड ड्रग्जचा धंदा ! केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा
मुंबई किती धोकादायक? काही सेकंदात घरासमोर उभी असलेली कार थेट जमिनीत, पहा व्हिडीओ
(One rupee clinic founder Rahul Ghule claims that his life is in danger will permanently shift to Delhi)