सुनील जाधव, कल्याण : डोंबिवलीमधील शांतीनगर परिसरात एकतर्फी प्रेमातून युवतीवर हल्ला झाला. तु मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्याबरोबर ये, युवकाने युवतीला असा एकतर्फी प्रस्ताव दिला. तिने नकार देताच धारदार चाकूने युवतीच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात ही विवाहित युवती गंभीर जखमी झाली. हल्ला करुन आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जखमी युवती रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली. कुटुंबियांनी तिला उपचारासाठी डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक तयार केले होते.
काय आहे प्रकरण
आरोपी जिग्नेश जाधव यांनी २५ वर्षीय विवाहित युवतीला रस्त्यात थांबवून तु मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझेबरोबर ये, असे सांगितले. युवतीने याला विरोध केला. त्यानंतर आरोपी जिग्नेश जाधव यांने युवतीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये युवती गंभीर जखमी झाली. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केले. पोलिसांनी तीन पथक बनवून आरोपी जिग्नेशला नाशिकमधून अटक केली.
असा केला हल्ला
डोंबिवली पूर्वेतील शांतीनगर येथील जैन मंदिर समोरील रोडवर ही घटना घडली. १४ एप्रिल रोजी वाशी येथे राहणारी एक 25 वर्षीय विवाहिता डोंबिवलीत आई, बहीण आणि भावाला भेटायला आली होती. तिचे त्या परिसरात राहणाऱ्या जिग्नेश यांच्यासोबत लग्नापूर्वीची मैत्री होती. ही युवती घरी पायी येत असताना जिग्नेश याने तिला रस्त्यावर थांबविले. तु मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तु माझे बरोबर ये असे सांगितले. तिने त्यास नकार दिला. याचा जिग्नेश याला राग आला. त्याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार केला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. यानंतर जिग्नेश याने घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांची पथके
जखमी युवती रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली. त्यानंतर तिचा भावाने तिला उपचारासाठी डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात जिग्नेश याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यासाठी पथक तयार केले. या पथकाने 4 दिवसांच्या प्रयत्नानंतर नाशिकमधून आरोपीला अटक केली. त्याला कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.