टुरिस्ट गाईड होण्यासाठी 700 जणांना पर्यटन विभागाकडून ऑनलाईन प्रशिक्षण 

| Updated on: Aug 19, 2021 | 5:29 PM

महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील 700 हून अधिक युवक - युवतींनी सहभाग घेतला आहे.

टुरिस्ट गाईड होण्यासाठी 700 जणांना पर्यटन विभागाकडून ऑनलाईन प्रशिक्षण 
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील 700 हून अधिक युवक – युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजूनही उपलब्ध असून पात्र इच्छूकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे. (Online training from Maharashtra Tourism department for 700 people to become tourist guides)

यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित, परवानाधारक मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटनस्थळांवर (पुरातत्व विभागाची सर्व पर्यटनस्थळे वगळता) मार्गदर्शक सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर भेट द्यावी किंवा योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्याशी 022-62948817 या क्रमांकावर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालयाने स्वीकारला आहे. http://www.iitf.gov.in पोर्टलवर मूळ ऑनलाइन कोर्स हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध पर्यटन पैलूंचे सात मॉड्यूल आहेत. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क 2 हजार रुपये आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व उस्मानाबाद या आकांक्षीत जिल्ह्यांचे अधिवासित रहिवाशांना नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क 500 रुपये इतके आहे.

उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि 18 ते 40 वयोगटातील असावा. उमेदवार 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याने किमान दहावी उत्तीर्ण असावे, अशा काही अटी या प्रशिक्षणासाठी आहेत, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

इतर बातम्या

गायकवाड-राज समर्थकांमध्ये ‘इतिहासा’वरून शाब्दिक राडा; गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देण्याचा इशारा

ठाण्याच्या कोविड रुग्णालयाने 500 कर्मचाऱ्यांना अचानक काढलं; दरेकरांचा रुग्णालय चालू न देण्याचा इशारा

औरंगाबादमध्ये उद्योजकांवरील हल्ले गंभीर, फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवा; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

(Online training from Maharashtra Tourism department for 700 people to become tourist guides)