कंगनाशी कौटुंबीक नातं, राजकीय संबंध जोडू नका; राज ठाकरेंच्या ‘मसल मॅन’ची प्रतिक्रिया

| Updated on: Dec 30, 2020 | 2:00 PM

अभिनेत्री कंगना रनौतसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याने अडचणीत आलेले मनसेचे मसल मॅन मनीष धुरी यांनी तात्काळ खुलासा केला आहे. (our family relation with kangana ranaut says manish dhuri)

कंगनाशी कौटुंबीक नातं, राजकीय संबंध जोडू नका; राज ठाकरेंच्या मसल मॅनची प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौतसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याने अडचणीत आलेले मनसेचे मसल मॅन मनीष धुरी यांनी तात्काळ खुलासा केला आहे. कंगनाशी आमचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं कौटुंबीक नातं आहे. त्याचा राजकीय संबंध जोडू नका, अशी प्रतिक्रिया मनीष धुरी यांनी व्यक्त केली आहे. (our family relation with kangana ranaut says manish dhuri)

मनसेचे अंबोल विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी काल मंगळवारी अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे कंगनाला शिवसेनेविरोधात बोलण्यासाठी मनसेचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चेनी जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर मनीष धुरी यांनी खुलासा केला आहे. कंगनासोबत आमचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे कौटुंबीक संबंध आहेत. त्यामुळे काल त्यांच्यासोबत देवदर्शनाला गेलो. त्याचा राजकीय संबंध जोडू नये, असं धुरी यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

कंगना काल सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी प्रभादेवीला आली होती. मराठमोळ्या वेषात आलेल्या कंगनाने यावेळी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईत राहण्यासाठी मला बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. इतर कुणाच्याही परवानगीची गरज नाही, असं कंगनाने म्हटलं होतं. यावेळी तिच्यासोबत मनसेचे पदाधिकारी होते. मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि त्यांचे बंधू कुशल धुरी कंगना रनौतसोबत होते. कंगनाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना दोन्ही धुरी बंधू तिच्यासोबत असल्यामुळे मनसेकूडन कंगनाला छुपं संरक्षण दिलं जात असल्याची चर्चा सुरू झाली होती.

कोण आहेत धुरी?

धुरी हे मनसेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांची मनसेत ‘मसल मॅन’ म्हणून ओळख आहे. मनसेकडून राबवण्यात येणाऱ्या खळ्ळखट्याक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. (our family relation with kangana ranaut says manish dhuri)

 

संबंधित बातम्या:

“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप

आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले

सिद्धिविनायक दर्शनावेळी राज ठाकरेंचा ‘मसल मॅन’ सोबतीला, कंगनाला मनसेचा छुपा पाठिंबा?

(our family relation with kangana ranaut says manish dhuri)