दुधात भेसळ करुन पिशवी मेणबत्तीने सील, रॅकेटचा पर्दफाश

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, भांडुप (मुंबई) : मुंबईच्या भांडुप तुलसीपाडा परिसरात दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. ही टोळी तुलसीपाडा परिसरात दुधात भेसळ करण्याचे काम करत होती. त्यामध्ये अमूल, महानंद, गोकुळ यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या कापून, त्यात भेसळ केली जात होती. त्यानंतर मेणबत्तीचा वापर करुन दुधाची पिशवी पुन्हा […]

दुधात भेसळ करुन पिशवी मेणबत्तीने सील, रॅकेटचा पर्दफाश
Follow us on

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, भांडुप (मुंबई) : मुंबईच्या भांडुप तुलसीपाडा परिसरात दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. ही टोळी तुलसीपाडा परिसरात दुधात भेसळ करण्याचे काम करत होती. त्यामध्ये अमूल, महानंद, गोकुळ यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या कापून, त्यात भेसळ केली जात होती. त्यानंतर मेणबत्तीचा वापर करुन दुधाची पिशवी पुन्हा सील पॅक करुन सर्वसामान्य ग्राहकांना दुधाची विक्री केली जात असे.

भांडुपच्या तुलसीपाडा परिसरात एकूण दोन ठिकाणी अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्रीच्या वेळी धाड टाकली. त्यात शेकडो लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आला आहे. इथे नामांकित कंपन्यांचा दुधात भेसळ करण्याचा प्रकार सुरु होता. दुधात घाणेरडं पाणी आणि इतर काही रसायन मिसळून तयार केलेला दूध आणलेल्या नामांकित कंपनीच्या दूध पिशव्यात मिसळून विकला जात होता. भेसळ करण्यासाठी उघडलेली दुधाची पिशवी लायटर किंवा मेणबत्तीच्या मदतीने सील पॅक केले जात होते.

दुधात भेसळ करणारा हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून भांडुपमध्ये सुरु असल्याची माहिती उघड झाली आहे. झोपडपट्टीतील एका खोलीत दुधात भेसळ करण्याचे सर्व साहित्य जमा करुन कस दुधात भेसळ केली जात होती.

पुढे घाणेरडं पाणी, रसायन अशांच्या भेसळीमुळे ते भेसळयुक्त दूध पिणाऱ्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भेसळीसह आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध विभागाला भांडुपमधील प्रकाराची माहिती मिळताच, कारवाई केली. मात्र, अनेक ठिकाणी असे भेसळीचे प्रकार सर्रास घड असातात. त्यावरही अशाच धडक कारवाईची गरज आहे.