मुंबई: जळगावमधील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचवायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनाच शिस्त नाही, ते इतरांना काय शिस्त लावणार? असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी केला. (pankaja munde slams maharashtra government over Cops force girls to dance in Jalgaon)
बीड जिल्हा सहकारी बँक, महिलांवरील अत्याचार आणि जळगावमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिलांवरील अत्याचार वाढत असून त्यावर सरकारकडून काहीही कारवाई होत नसल्याची तक्रार राज्यापालांकडे केली. सुमारे अर्धा-पाऊण तासाच्या या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून सरकारविरोधातील संताप व्यक्त केला. जळगावातील घटनेने महिलांवरील अत्याचाराचं प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. राज्यात अरेरावी सुरू आहे. जळगावातील घटनेत पोलीस अधिकारीच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यात चाललंय तरी काय? ज्या राज्यातील सत्तेतील लोकच आपल्या प्रतिमेचं पोषण करू शकत नाही. तेच जर अन्याय करणारे असतील तर दुसऱ्यांना काय शिस्त लागणार आहे?, असा सवाल पंकजा यांनी केला. मी विधानसभेत नाही. पण सभागृहाबाहेर महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवणार आहे. जळगाव घटनेतील संबंधितांना आधी निलंबित करा आणि मगच चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच या घटनेमध्ये लक्ष घालण्याची विनंती राज्यपालांना केल्याचंही त्यांनी सांगितलं.
माझ्यावर गुन्हा इतर मोकळे कसे?
दसरा मेळाव्यात गर्दी जमवली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण इतरांवर मात्र काहीच कारवाई करण्यात येत नाही. त्यांनी गर्दी जमवली तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही. याबाबतही राज्यपालांकडे तक्रार केल्याचं पंकजा यांनी सांगितलं.
बीड जिल्हा सहकारी बँकेसाठी कोर्टात जाऊ
बीड जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक रोखण्यात आली आहे. कोरोनाच्या नावाखाली बँकेवर प्रशासक नेमण्याचा डाव आखला जात आहे. राज्यपाल या प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे याबाबतची तक्रार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये निवडणूक घ्यायला परवानगी मिळते मग बीड जिल्ह्यातच परवानगी का नाही? असा सवालही त्यांनी केला. ही बँक बुडीत निघाली होती. आम्ही साडेपाचशे कोटीला ही बँक नफ्यात आणली. शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बँक आहे. ही बँक बरखास्त करण्याचं षडयंत्र सुरू आहे. या बँकेची निवडणूक व्हावी म्हणून आम्ही सहकार मंत्र्यांशी बोललो आहे. निवडणुका घ्यायच्या की नाही हे सहकार मंत्र्यांच्या हातात आहे. त्यांनी योग्य निर्णय घेतला तर निवडणुका होतील. ते दबावात आहेत का? हेच कळत नाही. सहकार मंत्र्यांनी योग्य निर्णय दिला नाही तर कोर्टात दाद मागू, असंही त्या म्हणाल्या. (pankaja munde slams maharashtra government over Cops force girls to dance in Jalgaon)
LIVE: महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/qXAy02VTxs
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 3, 2021
संबंधित बातम्या:
नारायण भंडारी, माधव भंडारी, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख आणि फडणवीसांची दिलगिरी
(pankaja munde slams maharashtra government over Cops force girls to dance in Jalgaon)