नवी दिल्ली: फोन टॅपिंगच्या मु्द्दयावरून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत. पण केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत. विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Pegasus spyware attack: devendra fadnavis hits out at manmohan singh and congress)
पेगसास स्पायवेअरद्वारे राजकीय नेते आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याच्या बातम्या आल्याने देशभर खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगवरून तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरच आरोप केले. तसेच काँग्रेसच्या काळात आणि विविध राज्यांमध्ये विविध सरकारांच्या काळात फोन टॅप कसे केले गेले, याची माहितीही दिली. भारतीय संसदेच अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशान अधिवेशनाच कामकाज डिस्टर्ब केल जात आहे, असं सांगतानाच पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आपल्याकडील टेलिग्राफ ॲक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळ असं काही करण्याची गरज नाही. सबंधित विभागानं अश्या बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली असून सत्य काय ते समोर येईलच, असं त्यांनी सांगितलं.
तत्कालीन मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करतंय असाही आरोप झाला होता. समजावादी पार्टीचे नेते अमरसिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, असं सांगितल होतं. जे काम झालंय ते लिगली झालंय असही त्यांनी सांगितलं होतं, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॅान्ड्रिग रोखण्यासाठी हे फोन टॅप झाल्याच सांगितलं. ते योग्य असल्याच समर्थन केलं होतं. फोन टॅपिंग होत असल्याची बातमी येणं चुकीचं असून याबाबत पुढे काळजी घेऊ असंही मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं. UPA च्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीर रित्या योग्य आहे हे सांगितलं गेलं, असंही त्यांनी सांगितलं.
पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण फक्त भारताची चर्चा होत आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतून हे होत आहे, असा दावाही त्यांनी केला. एक-दोन मीडिया हाऊसला चाईनीज फंडिंग मिळत असून त्यातू एक बदनामीचा अजेंडा राबवला जात आहे. भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. अशा बदनामीचा आम्ही निषेध करतो असं सांगतानाच बरोबर अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी हा रिपोर्ट कसा छापून येतो?, असा सवालही त्यांनी केला. (Pegasus spyware attack: devendra fadnavis hits out at manmohan singh and congress)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 July 2021 https://t.co/mZxOQFFwT6 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2021
संबंधित बातम्या:
दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंग हे धक्कादायक, मोदी, शहांनीच खुलासा करावा; राऊतांची मागणी
देशात कोणीही सुरक्षित नाही, संजय राऊतांचा पेगासस प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला
(Pegasus spyware attack: devendra fadnavis hits out at manmohan singh and congress)