सिडकोची बहुप्रतिक्षित योजना ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या २४ तासांतच तब्बल तब्बल १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. गृहनिर्माणाच्या क्षेत्रात सिडको महामंडळावर जनतेचा असलेला अतूट विश्वास या योजनेद्वारे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ ऑक्टोबर २०२४ ला वाशी, नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG)च्या या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. सदर योजनेचे संकेतस्थळ https:\\.cidcohomes.com असून नागरिक या योजनेस उत्तम प्रतिसाद देत आहेत.
नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ही ६७००० घरांची महायोजना साकारली जात असून, या गृहनिर्माण योजनेतील पहिल्या टप्प्यांतील २६००० घरे ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहेत. या योजनेतील प्रकल्पांचा विकास सिडकोच्या परिवहनकेंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर केंद्रित असून, या योजनेत साकारली जाणारी सर्व घरे ही संबंधित नोड्समधील रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि मेट्रो स्थानकांच्या जवळच बांधण्यात आली आहेत.
याशिवाय अतिशय अत्याधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या या योजनतील गृहसंकुले सर्व प्रकारच्या पायाभूत व सामाजिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत. या महायोजनेच्या नोंदणीला लाभत असलेल्या भरघोस प्रतिसादावरून सिडकोने गृहनिर्माणाच्या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानावर जनतेने पुन्हा एकदा केलेले शिक्कामोर्तब केले आहे.