मुंबई: शाश्वत विकास हाच आपला ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्याशिवाय पर्याय नाही, असं विधान राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे हे आज टीव्ही9 मराठीच्या महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हला (MahaInfra Conclave) आले होते. यावेळी त्यांना तुमचा ड्रिम प्रोजेक्ट (dream project) कोणता आहे? असा प्रश्न विचारला असता त्यांनी एका क्षणात आणि एका मिनिटात हे उत्तर दिलं. शाश्वत विकास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कुठलाही विकास करताना, झाडं कापताना आपल्याला दया येत नाही. 2 हजार ते 3 हजार झाडं कापणं हा पर्याय नाही. झाडं वाचवणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र हिरवागार करायचा की विकासाच्या नावाखाली सगळं उघडं करायचं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी शाश्वत विकास गरजेचा आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
प्रत्येक रस्ता बनवण्यात डिजायन थिंकीग हवं. कलानगर जंक्शन ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरलं जायचं, इतकं भयानक होतं. 2 लेनचा रस्ता मागे पुढे हवा. फूटपाथ एका रुंदीचा हवा. लास्ट माईल हे चालता आलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं, असं आदित्य यांनी सांगितलं. मुंबईतले कुठले रस्ते कसे होणार? असा सवाल केला असता, 2023 पर्यंत मेट्रो आणि रस्त्यांची कामे होणार आहेत. स्पीड पुढे मागे होतं, पण लोकांची भावना घेऊनच काम करावं लागतं., बुलडोजर चालवता येत नाही, असं त्यांनी सांगितलं.
पहिल्यांदाच स्टेट आणि बीएमसी एकाच सत्तेखाली असल्यामुळे कुणाचं दुमत होत नाही. सगळे एकत्र काम करतात. वेगाने रस्ते होत आहेत. रस्त्याच्या खाली 42 युटीलीटी आहेत, फायबर ऑप्टिकपासून सगळं आहे. त्यामुळे पोलिसांच्या परवानगी घेऊन अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्याही लगेच मिळायला लागल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांची कामे वेगाने होत आहे.
विकास आणि पर्यावरण सोबत नक्की जाऊ शकतो. आम्ही मुंबईच हिट मॅपिंग केलं. जिथं जिथं इन्फॉर्मल होम, झोपडपट्टी आहे, तिथं धोका आहे. तिथं झाडं नाही, प्लास्टीक आहे, तिथं हिट जास्त आहे. जिथं झाडं आहे, गार्डन आहे, तिथं हिट कमी आहे. परवानग्या देत असताना आम्ही सगळ्याचा विचार करतो. प्रत्येक घराला इलेट्रीक घरांचा पॉईंट आहे की नाही पाहतोय, शाश्वत विकास हा गरजेचा आहे. नाहीतर डायनासोर गायब झाले तसे आपणंही गायब होऊ, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
VIDEO: नक्षलवाद्यांच्या धमक्या येतात, माझ्यावर परिणाम होत नाही, मी फक्त काम करत राहतो: एकनाथ शिंदे