मोठी बातमी : नगर, कोल्हापूर, बीड, नागपूर, महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकाऱ्यांशी मोदींचा संवाद

| Updated on: May 20, 2021 | 12:07 PM

ढता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत, कोरोना लसीकरण कसे वाढवू शकतो | PM Modi district collectors from Maharashtra

मोठी बातमी : नगर, कोल्हापूर, बीड, नागपूर, महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकाऱ्यांशी मोदींचा संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई: देशातील कोरोना परिस्थितीचा खोलवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहेत. त्यामुळे या दोन बैठकांनंतर महाराष्ट्राच्यादृष्टीने कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (PM Narendra Modi dicusssion with 17 district collectors from Maharashtra)

काहीवेळापूर्वीच जिल्हाधिकारी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेला प्रारंभ झाला आहे. वाढता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत, कोरोना लसीकरण कसे वाढवू शकतो, आदी विषयांवर पंतप्रधान मोदी जिल्हाधिकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मोदींनी घेतली माहिती

काहीवेळापूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी राजेंद्र भोसले यांनी अहमदनगरमध्ये राबवण्यात येत असलेल्या कोरोना उपाययोजनांची माहिती मोदींना दिली. तर आदर्शगाव हिवरेबाजार कसे कोरोना मुक्त झाले, हेदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी मोदींना सविस्तरपणे सांगितले.

पंतप्रधान मोदी कोणत्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधणार?

अहमदनगर
सोलापूर
चंद्रपूर
नाशिक
सातारा
बुलढाणा
कोल्हापूर
सांगली
अमरावती
वर्धा
पालघर
उस्मानाबाद
जालना
लातूर
नागपूर
परभणी
बीड

सलग तिसऱ्या दिवशी देशातील कोरोना रुग्ण वाढले

देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची (Corona Cases in India) भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 76 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा घटल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानावा लागेल. कारण एका दिवसात 3 हजार 874 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा आदल्या दिवशी नोंदवलेल्या एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींच्या विक्रमापेक्षा जवळपास 650 ने कमी आहे.

संबंधित बातम्या:

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 34,031 कोरोनाबाधित सापडले, 51,457 रुग्ण कोरोनामुक्त

नरेंद्र मोदी दिलदार आहेत, गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील: राऊत

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही; मनसेचा हल्लाबोल

(PM Narendra Modi dicusssion with 17 district collectors from Maharashtra)