नरेंद्र मोदी यांचं सर्वात मोठं विधान, BMC निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग अखेर फुंकलंच

| Updated on: Jan 19, 2023 | 6:55 PM

मुंबईत 2014 पासून विकासकामांना गती मिळाली. पण मधल्या काळात म्हणजेच महाविकास आघाडीच्या काळात विकासाचा वेग मंदावला होता. पण आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा विकासाला वेग आला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचं सर्वात मोठं विधान, BMC निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग अखेर फुंकलंच
Narendra Modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याहस्ते आज विविध विकास कामांचे उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी अखेर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2023) प्रचाराचं रणशिंग फुंकलं. मुंबईत विकास कामं जलद गतीने करण्यासाठी भाजप (BJP) आणि एनडीएच्या (NDA) सरकारला पाठिंबा द्या. मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत 2014 पासून विकासकामांना गती मिळाली. पण मधल्या काळात म्हणजेच महाविकास आघाडीच्या काळात विकासाचा वेग मंदावला होता. पण आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा विकासाला वेग आला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

येणाऱ्या आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणं सुविधेचं होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांवरुन मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना अभिनंदन करतोय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नरेंद्र नोदी नेमकं काय-काय म्हणाले?

“मुंबईच्या रस्त्यांना सुधारण्यासाठी जे काम सुरु झालंय ते डबल इंजिन सरकारचा निश्चय दाखवतो. आम्ही प्रदूषणपासून स्वच्छता प्रयत्न प्रत्येक सुविधेसाठी काम करत आहोत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“शहरांच्या विकासासाठी देशाजवळ सामर्थ्य आणि राजकीय इच्छाशक्ती याची कमतरता नाही. पण आम्हाला एक गोष्ट समजायला हवी. मुंबई सारख्या शहरात प्रोजक्टला तोपर्यंत गती मिळणार नाही जोपर्यंत स्थानिक पालिका प्राथमिकता तेज विकासाची नसणार”, असं मोदी म्हणाले.

“जेव्हा राज्यात विकासासाठी समर्पित सरकार असते, जेव्हा शहरात सुशासनासाठी समर्पित शासन असेल तेव्हा हे काम वेगाने होतं. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

‘विकासाचा पैसा भ्रष्टाचाराला लागेल मग…’

“मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही. फक्त मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी लागायला हवी. तो पैसा भ्रष्टाचारात लागेल, विकासाला रोखण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईचा विकास कसा होईल?”, असा सवाल मोदींनी केला.

“मुंबईकर त्रास सोसत राहिले, शहर विकासासाठी याचना करत राहिले, पण ही स्थिती मुंबईत आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कधीच होऊ शकत नाही”, असं मोदी म्हणाले.

“मी मुंबईकरांकडे जबाबदारी ही गोष्ट सांगतोय, भाजप, एनडीए सरकारने विकासासाठी राजकारण आणलं नाही. विकास हेच आमची प्राथमिकता आहे. आम्ही विकास कामांना कधीच ब्रेक लावत नाही. पण आम्ही मुंबईत असं वारंवार होताना पाहिलं आहे”, अशी टीका त्यांनी केली.

“आमच्या प्रत्येक कामात अडचणी आणल्या गेल्या. असं पुन्हा होऊ नये यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्र आणि मुंबईपर्यंत सगळ्यांची ताकद लागायला हवी. एक ताळमेळची व्यवस्था व्हावी”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.