मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. या अधिवेशनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑलिम्पिक परिषदेच्या कार्यक्रमात टीम इंडियाला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरोधात विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं.
This is amazing !
Hon PM @narendramodi ji lauds and congratulates #TeamIndia as he stood for his speech in Mumbai, for the phenomenal performance and victory over Pakistan in the #IndVsPak #WorldCup match held at world’s largest cricket stadium #NarendraModiStadium !भारत माता… pic.twitter.com/YlJrg2hokl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 14, 2023
धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासीमध्ये समाविष्ठ करु नका, देशात आदिवासी खासदारांची संख्या मोठी आहे याचे भान ठेवा केंद्र सरकारही कोसळायला वेळ लागणार नाही असे थेट दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारला इशारा दिलाय
पुण्यात गादी कारखान्याला भीषण आग लागलीये. पुण्यातील वडकी परिसरातील ही घटना आहे. दुपारी ३ च्या सुमारास घडली घटना. आगीत कुठलीही जिवितहानी नाही. अग्निशमन दलाच्या ७ वाहनांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकदिवसीय मुंबई दौऱ्यासाठी आज मुंबई विमानतळावर आगमन झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनासाठी ते मुंबईत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलं.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते.
मीरा भाईंदर येथे रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने त्यात पडून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये. भाईंदरच्या इंद्रलोक संकुलात ही घटना घडलीये. स्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विरारमधील दोन तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. वज्रेश्वरी अंबाडी वासिम रस्त्यावर काल रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. फिरोज रफिक शेख ( वय 27 ),अजीम अस्लम सय्यद ( वय 30 ) असे जखमींचे नाव असून त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावरुन जिओ वर्ल्ड सेंटरच्या दिशेला रवाना झाले आहेत.
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘जियो वर्ल्ड सेंटर’ बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 व्या सत्राच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या सेंटरचा परिसर श्वान पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाद्वारे आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा तपासण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावरून 5 वाजून 40 मिनिटांनी वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘जिओ वर्ल्ड सेंटर’च्या दिशेने रवाना होतील. त्यांचं पारंपारीक पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे, ज्याची तयारी सध्या पूर्ण झालीय.
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेस बैस मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.