मुंबई: नगरपंचायत निवडणुकीत पोलादपूर नगरपंचायतीवर भगवा फडकताच शिवसेना नगरसेवकांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिंदे यांनी या सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करत भविष्यातही अशाच पद्धतीने काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पोलादपूरमध्ये भगवा फडकला आहे. शिवसेनेचे 10 नगरसेवक पोलादपुरात निवडून आले आहेत. या सर्वांनी काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्तानी भेट घेतली. पोलादपूरमध्ये नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी शिवसेनेने 10 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने 6 जागा जिंकल्या असून भाजपला 1 जागा मिळाली आहे. पोलादपूरची लढाई ही अतिशय महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
पोलादपुरात भाजप विरुद्ध शिवसेना रणसंग्राम चांगलाच शिगेला पोहोचला होता. मात्र शिवसेनेबरोबर काँग्रेसने देखील खांद्याला खांदा लावून याठिकाणी लढत दिली. या निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी करत सहा नगरसेवक निवडून आणले. भाजपला मात्र त्यांचा एकच उमेदवार या ठिकाणाहून निवडून आणता आला.
या निवडणुकीचं वैशिष्ट्ये म्हणजे युवा सेनाही पुढाकार घेऊन पोलादपूरमध्ये सक्रिय झाली होती. त्यामुळे शिवसेनेला अधिकच बळ मिळालं होतं. शिवसेनेने युवा सैनिकांनाही तिकीट दिलं होतं. निवडून आलेल्यांमध्ये चार युवा सैनिक आहेत. युवा सैनिकांना तिकीट मिळाल्याने युवा सैनिकांनी पोलादपुरात स्वत:ला झोकून दिलं होतं. युवा सेना नेते व वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली विकास गोगावले यांनी पोलादपूरमधील नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी सांभाळली होती. आपल्या सर्व विजयी उमेदवारांसह विकास गोगावले यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला..
एकनाथ शिंदे यांनी सगळ्या विजयी उमेदवारांची भेट घेतली. तसेच युवा सेनेने केलेल्या कामाची स्तुती केली. भविष्यातही असचं काम सुरू ठेवा. शिवसेनेला आणखीन बळकट करा, असं सांगत या सर्व उमेदवारांना शिंदे यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 21 January 2022 pic.twitter.com/jad1VrIbWp
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2022
संबंधित बातम्या:
‘गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ, डिपॉझिट जरी वाचले तरी…’,आशिष शेलारांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज
Rohit Patil: रोहित पाटील म्हणतात, संघर्ष आम्हाला नवा नाही; भाजपच्या नेत्यानेही केलं अभिनंदन
दुस-या जागेचा विचार नाही, माझी भूमिका ठाम आहे; मी पणजीतूनच लढणार