नालासोपारा : मुंबईच्या (Mumbai) नालासोपारामधून (Nalasopara) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तुलिंज पोलीस ठाण्यात एका पोलीस हवालदाराने आत्महत्या (Police constable committed suicide) केली आहे. स्वत:वर गोळ्या झाडून हवालदाराने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Police constable committed suicide on duty shot himself and ended life)
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडे सहा वाजताची ही घटना आहे. सखाराम भोये असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस हवालदाराटचं नाव आहे. सखाराम यांच्या अशा जाण्यामुळे पोलीस दल हादरले आहे. सखाराम यांनी ऐवढं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे सखाराम भोये यांनी पोलीस ठाण्यातच गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे पोलीस दलालाही मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर तात्काळ सखाराम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढली तपास सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखाराम यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, सखाराम यांनी आत्महत्या का केली ? याचा तपास सध्या सुरू आहे. यासाठी पोलीस त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Police constable committed suicide on duty shot himself and ended life)
इतर बातम्या –
अल्पवयीन ट्रान्सजेंडरने केली आत्महत्या, शाळेत स्कर्टवरून झाला होता अपमान; Video Viral
कल्याणमध्ये मुळशी पॅटर्न? जेलमधून सुटलेल्या आरोपीचे फटाके फोडत स्वागत, जल्लोषात फरार आरोपीही सहभागी
मंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या, आता बच्चू कडू म्हणतात, मंत्रिपद पणाला लावणारhttps://t.co/4KhOX7bUFB#Farmers #farmersuicide
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2020
(Police constable committed suicide on duty shot himself and ended life)