मुंबई : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकारणाचा दर्जा घसरत चालला आहे. यासंदर्भात शरद पवार यांच्यासह अनेक जणांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील राजकारणाची चर्चा देशपातळीवर होत आहे. आता राज्यातील राजकारण संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत नेण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 20 जून जागतिक गद्दार दिवस साजरा करण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे केली. त्यासंदर्भात पत्र त्यांनी युनोला लिहिले आहे. त्याचवेळी भाजप आमदार नितेश राणे यांनीही संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिले आहे. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. मात्र, तो दिवस देशद्रोही दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी युनोकडे केली आहे.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आजचा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेनं जागतिक गद्दार दिवस म्हणून जाहीर करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळानंतर जगातील सर्वात मोठी गद्दार मागच्या वर्षी आजच्या दिवशी झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी गद्दारी केली. त्याहून मोठी गद्दारी याआधी झाली नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे की, आजच मी युनायटेड नेशनला पत्र दिल आहे. 27 जुलै हा देशद्रोही दिवस जाहीर करावा, अशी विनंती केलीय. 27 जुलै हा उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. उद्धव ठाकरे खरे देशद्रोही आहेत. त्यांनी स्वतःच्या वडिलांसोबत गद्दारी केली आहे. मराठी माणूस, हिंदू धर्माशी त्यांनी बेईमानी केली. ज्या भाजपने उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांना सांभाळलं. हिंदुत्वाच्या मुद्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती उद्धव ठाकरे यांनी तोडली. मुख्यमंत्रीपदाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षीमुळे त्यांनी ही युती तोडली. त्यांनी देश, मराठी माणूस यांच्यासोबत द्रोह केला, असे म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे याना बाळासाहेब कधी कळले होते का? असा सवाल त्यांनी केला.
PUBLIC DEMAND!@UN@antonioguterres@UNinIndia @PMOIndia @UNICEFIndia @ShivSenaUBT_ @OfficeofUT @AUThackeray @unfoundation @UNHumanRights@rautsanjay61
Pls declare 27 July as “TRAITOR DAY” . One of the biggest traitor ever seen or experienced was born on this day . He…
— nitesh rane (@NiteshNRane) June 20, 2023
मुंबई महानगरपालिकेतील कारभाराची आता चौकशी होणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांची सर्व प्रकरणे बाहेर येतील. मुंबई महापालिकेत किती भ्रष्टचार झाला आहे, हे सर्व बाहेर येईल. मागील काळात मुंबई मनपात भाजपचा महापौर बसवला असता. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मैत्री जपली आणि शिवसेनेला महापौर पद दिले, याची आठवण नितेश राणे यांनी करुन दिली.