मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत वनमंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण या तिघांवर संशय व्यक्त केला गेला आहे. मात्र, अद्यापर्यंत या तिघांपैकी एकानेही पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. या प्रकरणातील विलास चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा असल्याचं मानलं जात आहे. विलासला ताब्यात घेतल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं. पण विलासही गायब असल्याने हा विलास कोण आहे? तो कुठे आहे? याबाबतचं गूढ वाढलं आहे. (Pooja Chavan Suicide Case: who is vilas chavan?, where is he?)
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यातील एका क्लिपमध्ये कथित मंत्री आणि विलास चव्हाणचं संभाषण झालं होतं. या कथित क्लिपमध्ये विलास हा पूजाचा भाऊ असल्याचं अरुण राठोडने पोलिसांनी सांगितल्याचं दिसून येतं. परंतु, पूजाची चुलत आजी शांताबाई यांच्यानुसार पूजाला एकही भाऊ नाही. त्या सहा बहिणी आहेत. त्यात पूजा पाचवी आहे. इतर चौघींची लग्नं झालेली आहेत. त्यामुळे हा विलास चव्हाण कोण? तो पूजा सोबत पुण्यात का राहत होता? अरुणने तो पूजाचा भाऊ असल्याचं का सांगितलं? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.
विलास चौकशीत महत्त्वाचा दुवा ठरणार?
पूजा चव्हाण प्रकरणात विलास चव्हाण हा महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचं बोललं जातं. विलास हा पूजाच्या रुममध्ये राहत होता. शिवाय पूजाने आत्महत्या केली. त्या दिवशी तो तिथेच होता. रुग्णालयातही तो होता. तसेच कथित मंत्र्याच्या संपर्कातही होता. त्यामुळे पोलीस चौकशीत त्याची साक्ष महत्त्वाची ठरू शकते, असं सूत्रांनी सांगितलं.
कोण आहे विलास?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास चव्हाण हा वन विभागातील सामाजिक वनीकरण विभागात नोकरीला होता. जानेवारीपासून तो या विभागात शिपाई म्हणून कार्यरत होता. पूजा चव्हाणच्या आत्महत्येपूर्वी म्हणजे एक महिनाच तो या विभागात आला होता. कंत्राटदार कंपनीने त्याची या विभागात नेमणूक केली होती. विलाससह अरुणही याच विभागात कामाला होता. त्यामुळे दोघांची चांगली ओळख झाली होती. विलासही बीडचाच असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
क्लिपमधील संवाद काय सांगतो?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एकूण 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यातील शेवटची क्लिपमध्ये अरुण, विलास आणि कथित मंत्र्यांचा संवाद आहे. पूजाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतरचा या तिघांचा हा कथित संवाद आहे. मात्र, या क्लिपमधील आवाजाबद्दल कोणीही पृष्टी केलेली नाही. शेवटची क्लिप ही 2 मिनिटं 22 सेकंदाची आहे. रुग्णालयातील हा संवाद आहे. या ठिकाणी पूजाचं शवविच्छेदन सुरू आहे. या ठिकाणी तिचा भाऊ विलासही आहे.
अरुण: पोस्टमार्टेम सुरू आहे.
मंत्री: असं का…
मंत्री: दोरीने चढ आणि मोबाईल काढ. चऱ्हाटाने जा.
त्यानंतर मंत्री विलासशी संवाद साधतात.
विलास: सर काय करू? (विलासचा सूर रडवेला आहे. तो घाबरलेला आहे. हे त्याच्या बोलण्यातून जाणवतं)
मंत्री: काय करू शकतो विलास? ( मंत्र्याच्या या प्रश्नानंतर विलास रडायला लागतो)
मंत्री: तू हिंमतीने काम घे.
विलास: काय करू? डॉक्टर म्हणतात पीएम (शवविच्छेदन) करा.
मंत्री: दुसरी काय करू शकतो आपण.
त्यानंतर अरुण आणि मंत्र्याचा संवाद होतो. मंत्री त्याला घराचं बांधकाम तोडून आत जायला सांगतात. तसेच कुणी विचारलं तर आम्ही झोपलो होतो. ती चक्कर येऊन पडली, असं सांग असं मंत्री विलासला सांगतात. त्यावर माझी सांगायची हिंमत होत नसल्याचं विलास म्हणतो. पण तरीही मंत्री त्याला चक्कर येऊन पडल्याचं सांग म्हणून सांगतात. गॅलरीतून बॅलन्स गेला, चक्कर आली, असंही सांगतात. शेवटच्या क्लिपमध्येही मंत्री अरुणला मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. मोबाईल ताब्यात घे. दरवाजा तोड. आवाज आला तरी चालेल, असंही ते सांगतात. (Pooja Chavan Suicide Case: who is vilas chavan?, where is he?)
काय घडलं त्या रात्री?
पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटी ही तीन मजली आहे. यातील तिसऱ्या मजल्याला पायऱ्या नसल्याने या मजल्यावर कोणालाही जाता येत नाही. या संपूर्ण इमारतीत केवळ पाच कुटुंब राहतात. पूजा पहिल्या मजल्यावर राहत होती. टू-बीएचकेच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. सोसायटीच्या समोर सिमेंटचा रस्ता आहे. पहिला मजला आणि रोडचं अंतर 30 ते 32 फूट असल्याचं सांगण्यात येतं. पूजाने रविवारी 7 फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजता आत्महत्या केली. पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून तिने उडी मारून आत्महत्या केली. 30 ते 32 फूटावरून तिने उडी मारल्याने तिच्या डोक्याला मार गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Pooja Chavan Suicide Case: who is vilas chavan?, where is he?)
VIDEO: TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7 : 30 PM | 20 February 2021 https://t.co/x6IJJFgAIR#Top9News #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021
संबंधित बातम्या:
परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल
(Pooja Chavan Suicide Case: who is vilas chavan?, where is he?)