मुंबई: मुंबई महापालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली असून लाड यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण 2009मधील असताना पोलिसांनी आता नोटीस पाठवण्याची गरज काय? इतके दिवस पोलीस झोपले होते काय? असा सवाल करतानाच केवळ सूडबुद्धीतूनच मला नोटीस बजावण्यात आली आहे, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. (prasad lad has denied financial irregularities Allegations)
प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मला नोटीस पाठवल्याचं आताच कळलं. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. 2009 साली ही तक्रार दाखल करण्यात आली होती. बीव्हीजी आणि क्रिस्टलने मिळून हे काम केलं होतं. आमचं काम समाधानकारक होतं म्हणून पालिकेने आमचं डिपॉझिटही परत केलं आहे. याचाच अर्थ यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. शिवाय हे प्रकरण दहा वर्षांपूर्वीचं आहे. मग त्यावर आत्ताच नोटीस देण्याची गरज काय? इतके दिवस पोलीस झोपले होते का? असा सवाल लाड यांनी केला.
कोर्टात धाव घेणार
दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत माझं कुठंही नाव नाही. हे सरकार फक्त आमच्या विरोधात कारवाया करत आहे. हा खोटा गुन्हा असून तो रद्द करण्यात यावा यासाठी मी कोर्टात धाव घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
अब्रुनुकसानीचा दावा करणार नाही
हा वाद दोन नेत्यांमधील आहे. 2013 साली सत्यपाल सिंग यांनी ही केस स्कॉश केली होती. मग ही केस परत का उघडण्यात आली, असा सवाल करतानाच आता मी या प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (prasad lad has denied financial irregularities Allegations)
मीही पालिका घोटाळ्याच्या फायली देऊ का?
इतर लोकांनी पत्रकार परिषदेत जशी उत्तरे दिली तसंही मी करणार नाही. मी माझ्या कामात नेहमीच यशस्वी झालेलो आहे. चौकशीच करायची असेल तर महापालिकेत अनेक घोटाळे झाले आहेत. तिथेही तपास करा. भाजप नेते किरीट सोमय्या आणि खासदार मनोज कोटक कागदपत्रं घेऊन घोटाळे बाहेर काढत आहेत. मग तिथे कारवाई कधी करणार? उद्यापासून मीही पालिका घोटाळ्याच्या फायली द्यायला सुरुवात केली तर?, असा टोलाही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला. (prasad lad has denied financial irregularities Allegations)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/Gb2VXyRU1V
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2021
संबंधित बातम्या:
भाजप आमदार प्रसाद लाड यांची चौकशी होणार; मुंबई पोलिसांची नोटीस
भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत; पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
मोठी बातमी: वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स; पुन्हा चौकशी होणार
मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात, भातखळकरांचा घणाघात
(prasad lad has denied financial irregularities Allegations)