मोठी बातमी: प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला, साडेदहा वाजता दोघांचीही भेट होणार, कारण गुलदस्त्यात!

| Updated on: Jun 11, 2021 | 9:04 AM

प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत.

मोठी बातमी: प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला, साडेदहा वाजता दोघांचीही भेट होणार, कारण गुलदस्त्यात!
prashant kishor sharad pawar
Follow us on

मुंबई: पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी येतील. या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. (Prashant Kishor will meet NCP chief Sharad Pawar)

प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे ह्या भेटीची मोठी उत्सुकता आहे.

‘निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांचा संन्यास’

पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे तृणमूल काँग्रेसला 200 हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. मात्र, निकालाच्या दिवशी प्रशांत किशोर यांनी आपण या निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी भेट नेमकी कशासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय असणाऱ्या आघाडीबाबत काही बोलणी होऊ शकतात का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष: शरद पवार

कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना (Shiv Sena) हा विश्वास असणारा पक्ष आहे, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात म्हटले होते. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

West Bengal Election: ‘बंगालच्या हिंदू मतदारांना भाजपविषयी तितकसं ममत्व नाही; भाजपला 100 जागाही मिळणार नाहीत’

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं प्रशस्तीपत्र

शरद पवारांचा महाविकास आघाडीवर भर, तरीही नाना पटोलेंची स्वबळाचीच भाषा?

(Prashant Kishor will meet NCP chief Sharad Pawar)