मुंबई: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दरेकर यांच्या नेतृत्वाखालील 21 पैकी 21 जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार विजयी झाले होते. याआधी 21 पैकी 17 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरीत 4 जागेवरील सहकार पॅनेलचे उमेदवार आज विजयी घोषित करण्यात आले होते. दरेकर यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला म्हणावं तसं यश आलं नव्हतं.
या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले होते. 4 हजार 581 मतदारांनी निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला होता. 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. त्यापैकी 17 जणांनी बिनविरोध झाली होती. प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतरही चार जागांसाठी मतदान झाले. त्या जागाही सहकार पॅनलच्या पदरात पडल्याने बँकेवर सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झालं आहे.
या विजयाबद्दल मुंबईकरांचं, मुंबईतील सहकारातील सर्व संस्थांचं मनापासून आभार मानतो. कधी नव्हे एवढं अभूतपूर्व यश आमच्या पॅनलला दिलं आहे. सर्व प्रथम 21 पैकी 17 जागा निवडून दिल्या. त्यापैकी 4 जागांची निवडणूक काही लोकांच्या हट्टापायी, अडेलतट्टू भूमिकेमुळे घ्यावी लागली. पण त्याही जागा आम्ही जिंकलो, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर म्हणाले.
दरम्यान, या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर वर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे वाद झाला होता. त्याला विरोधी गटाने आक्षेप घेतला होता. दरेकर मजूर कसे असू शकतात, मजुराची व्याख्या काय असे सवाल या निमित्ताने करण्यात आले होते.
चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांना धूळ चारली. विठ्ठल भोसले यांना 18 तर सुखदेव चौगुले यांना 16 मते मिळाली. तर पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा जबरदस्त पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना 131 मते पडली. तर कमलाकर नाईक यांना अवघी 59 मते मिळाली. जयश्री पांचाळ यांना 332 मतं तर, शालिनी गायकवाड यांना 188 मतं मिळालीत. तर अनिल गजरे हे 4 हजार मते घेऊन विजयी झाले. तर यलाप्पा कुशाळकर यांना अवघी 350 मते मिळाली.
मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघ
विठ्ठल भोसले (NCP)
प्राथमिक ग्राहक मतदारसंघ
पुरुषोत्तम दळवी (INC)
महिला सहकारी संस्था मतदारसंघ
जयश्री पांचाळ (NCP)
भटक्या जाती,विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघ
अनिल गजरे (BJP)
नागरी सहकारी बँक
संदीप सीताराम घनदाट
आ. प्रविण यशवंत दरेकर
पगारदार सहकारी संस्था
आ. प्रसाद मिनेश लाड
नागरी सहकारी पतसंस्था
शिवाजीराव विष्णू नलावडे
गृहनिर्माण संस्था
आ. सुनील राजाराम राऊत
अभिषेक विनोद घोसाळकर
मजूर सहकारी संस्था
आ. प्रविण यशवंत दरेकर
आनंदराव बाळकृष्ण गोळे
औद्योगिक सहकारी संस्था
सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे
विष्णू गजाभाऊ घुमरे
इतर सहकारी संस्था
नंदकुमार मानसिंग काटकर
जिजाबा सीताराम पवार
व्यक्तिगत (वैयक्तिक)
सोनदेव बाळाजी पाटील
महिला राखीव मतदार संघ
शिल्पा अतुल सरपोतदार
कविता प्रकाश देशमुख
अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
विनोद दामू बोरसे
इतर मागासवर्गीय मतदार संघ
नितीन धोंडीराम बनकर
संबंधित बातम्या:
जन्मदात्या आईची हत्या, वडिलांवर कोयत्याने वार, जमिनीच्या वादातून इंदापुरात मुलाचा हल्ला