निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने; दरेकरांची टीका

| Updated on: Jan 15, 2021 | 8:18 PM

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचाची निवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यावरून राजकारण तापले आहे.

निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने; दरेकरांची टीका
Follow us on

मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचाची निवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यावरून राजकारण तापले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या मुद्द्यावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारचा हा निर्णय केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. (pravin darekar oppose maharashtra government decision of Gram Panchayat Election Sarpanch Lottery after polls)

प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. सरकारचे सर्व निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आहेत. एपीएमसीचा निर्णय असो किंवा नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय असो प्रत्येक निर्णय या सरकारने फिरवला आहे. जनतेसाठी असलेले निर्णय बदलले जात आहेत. सत्ता आणि पैशाच्या जोरावर ग्रामीण पातळीवरील राजकारण कसं बदलता येईल, यावर सरकारचा भर आहे, असा आरोप त्यांनी केला.

सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीपूर्वी केल्यास घोडेबाजार होऊ शकतो, हा सत्ताधाऱ्यांचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. सरपंचपदाचं आरक्षण आधी काढलं काय आणि नंतर काढलं काय? काय फरक पडणार आहे? असा सवाल करतानाच घोडेबाजार करणारेच घोडेबाजाराबद्दल बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली.

रासपचा विरोध

महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील रासपनेही राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे सामान्य उपेक्षित समाजाला संधी मिळणार नाही. जनतेतूनच सरपंच निवडायला हवा होता आणि त्यावेळीच आरक्षणाची सोडत काढायला हवी होती. आता गावच्या प्रस्थापितांच्या हातात सत्तेची सूत्रं जाणार असून त्याला आमचा विरोध असणार आहे. आम्ही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या निर्णयाचा विरोध करणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं. तसेच निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत काढली तरी घोडेबाजार होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. (pravin darekar oppose maharashtra government decision of Gram Panchayat Election Sarpanch Lottery after polls)

 

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणुकीची मोठी बातमी – सरपंचांची सोडत निवडणुकीनंतर, आधीची सोडत रद्द

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची

(pravin darekar oppose maharashtra government decision of Gram Panchayat Election Sarpanch Lottery after polls)