मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे पार पडलेल्या शेतकरी मोर्चावर टीका केली आहे. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी? या आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. (pravin darekar reaction on Farmers Protest in mumbai)
आझाद मैदानात आज शेतकऱ्यांचा विराट मोर्चा पार पडला. या मोर्चाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावरून प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. या आंदोलनात लोकं घुसवली आहेत. इथली लोकं शेतकरी म्हणून आंदोलनात घुसली. भेंडीबाजारात कुठून आलेत शेतकरी? असा सवाल दरेकर यांनी केला. आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानेच अशा प्रकारची गर्दी गोळा करण्याची आघाडीवर वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली.
रोखठोक भूमिका घेणारी शिवसेना उरली नाही
या आंदोलनात शिवसेनेचा एकही नेता सहभागी झाला नाही. त्यावरूनही दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आजच्या आंदोलनाने शिवसेनेला भूमिकाच नाही हे स्पष्ट झालं आहे. आता रोखठोक भूमिका घेणारी शिवसेना उरली नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना मोर्चात येऊ नको म्हणून सांगितलं. पवारांचा हा सल्ला समजायला वेळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच सोडा पण शिवसेनेचा एकही नेता या आंदोलनाकडे फिरकला नाही, असंही ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे. पण काही राजकीय पक्ष त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे करत आहेत, असा टोलाही त्यांनी केला.
कुणाच्याही भानगडी काढू नये
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मलाही सर्वांच्या भानगडी माहीत आहेत. त्या बाहेर काढू का? असा इशारा विरोधकांना दिला होता. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावलं होतं. त्यावर कुणी कुणाच्या भानगडी काढू नये. हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं पाहिजे, असा सल्ला दरेकर यांनी पवारांना दिला. (pravin darekar reaction on Farmers Protest in mumbai)
VIDEO : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी pic.twitter.com/DnffvyXsvb
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 24, 2021
संबंधित बातम्या:
Farmer Protest : 60 दिवस होऊनही केंद्राने याची दखल घेतलेली नाही : आदित्य ठाकरे
‘लाल वादळ’ राजभवानाच्या दिशेने, मोर्चेकऱ्यांना अडवलं; पोलिसांबरोबर आंदोलकांची झटापट
(pravin darekar reaction on Farmers Protest in mumbai)