नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकरांची मागणी

| Updated on: Nov 10, 2021 | 1:36 PM

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आलेले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केलीय.

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकरांची मागणी
प्रविण दरेकर
Follow us on

मुंबई: भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्यांनी मानसोपचार तज्ञ कडे जाऊन उपचार करावेत, असा टोला लगावला आहे. कुठल्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता पुरावे सादर न करता केवळ आरोप करत राहणं अशा प्रकारचं काम नवाब मलिक करत आहेत, असंही दरेकर म्हणाले. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आलेले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केलीय.

नवाब मलिक यांनी आज हाजी अराफत शेख आणि मुन्ना यादव यांचं नाव घेतलं. माझा त्यांना सवाल आहे की हाच त्यांचा हायड्रोजन बॉम्ब होता का? काल जो देवेंद्र फडणवीस यांनी जो स्फोट केला आहे त्यातून ते अजूनही सावरलेले दिसत नाही. कारण त्यांचे 1993 मधल्या आरोपी सोबतचे संबंध आता समोर आलेले आहेत, असं दरेकर म्हणालेत.

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आलेले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केलीय.

नवाब मलिकांचे आरोप फुटकळ

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप फुटकळ आहेत. मलिकांच्या आरोपाला कसलाही आधार नाही, असंही दरेकर म्हणाले.

नवाब मलिक यांच्यावर आशिष शेलारांचा हल्लाबोल

नवाब मलिक सकाळी लवंगी देखील लावू शकले नाहीत. लवंगी लावण्याच्या प्रयत्नात त्यांचे हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता इतकी होती त्यांना हायड्रोजन सोडा ऑक्सिजन लागेल, असं आशिष शेलार म्हणाले. मुन्ना यादव, हाजी हैदार, हाजी अराफतचा भाऊ यासह नाव सांगून नवाब मलिक यांनी प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. याचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडणं म्हणजे अकबर आणि बिरबलाच्या गोष्टीशी आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

इतर बातम्या:

रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला लपवलंय का? आशिष शेलार यांचा सवाल

नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बनंतर देवेंद्र फडणवीसांचं लगेचच ट्विट; म्हणाले, डुकराशी कुस्ती…

Pravin Darekar said Nawab Malik lost psychological balance and demanded file sedition case on Malik