मुंबई: एनसीबीने क्रूझवर टाकलेल्या धाडीत भाजप नेत्याचा मुलगा होता की नाही हे अजून सिद्ध व्हायचं आहे. त्या आधीच नवाब मलिक आरोप करून मोकळे झाले आहेत, असं सांगतानाच नवाब मलिक यांच्या जावयालाही एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे मलिक यांनाही जबाबदार धरायचे का?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
प्रविण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. नवाब मलिक आरोप करून केवळ सनसनाटी निर्माण करत आहेत. कायदा हा सर्वांना समान असतो. त्यामुळे मुंबई पोलीस तुमच्याकडे आहे. तुम्हा कॉल रेकॉर्ड तपासू शकता. पण बेछूट आरोप करून मलिक कोणता तीर मारत आहेत?, असा सवाल करतानाच एनसीबीच्या धाडीत भाजप नेत्याचा मुलगा होता की नाही हे अजून सिद्ध व्हायचं आहे. पण मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे मलिक यांना जबाबदार धरायचे की राष्ट्रवादीला? असा सवाल दरेकर यांनी केला.
सध्या ड्रग्जबाबत कारवाई केली जात आहे. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. पण मलिक उगाच सनसनाटी निर्माण करत आहेत. व्हिडीओ आणि फोटो कॉर्प केला असावा. मला वाटतं या सर्व प्रकरणाचा तपास केल्याशिवाय बोलता येणार नाही. तपास होऊ द्या, असंही त्यांनी सांगितलं. मलिक यांच्या जावयाला अटक केल्यापासून ते विविध विधाने करत आहेत. भाजपला मुद्दाम बदनाम केलं जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी चिपी विमानतळाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. हा कोकणातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. सर्वांना बरोबर घेऊन त्याचं उद्घाटन व्हायला हवं होतं. पण महाविकास आघाडी प्रत्येक गोष्टीत सर्व श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला आले असते तर श्रेय मिळालं नसतं म्हणून नाव टाकलं नाही, असा दावा करतानाच चिपीसाठी भाजपने मोठं योगदान दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेत्याच्या मेहुण्याला आणि इतर दोघांना सोडण्यासाठी राज्य आणि दिल्लीतील भाजप नेत्यांचा दबाव होता. हे सर्व प्रकरण फर्जी आहे. मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम एनसीबीच्या माध्यमातून सुरु आहे. पंचनाम्यावेळी यांचे पंच आहेत, त्यांचा वेगवेगळे पत्ते देण्यात आले आहेत, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केलाय. मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे माझी मागणी आहे, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांनी सीआरपीएफच्या ताब्यातील बोटीचं सीसीटीव्ही मागितलं पाहिजे. त्यातून अनेक खुलासे समोर येतील, असा दावा मलिक यांनी केलाय.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 October 2021 https://t.co/IYnP9ZfALa #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021
संबंधित बातम्या:
NCB नं ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? मलिकांनी तिन नावं फोडली, भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी, शिवसेना, आर्यन खानच्या पाठिशी? मलिकांनंतर आता अरविंद सावंत यांची ‘मुंबईची बात’
(pravin darekar targets nawab malik on rishabh sachdev)