पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रोड शो’ला कोणकोणत्या नेत्यांची उपस्थिती, चर्चेतील हा नेता उपस्थित राहणार का?

| Updated on: May 15, 2024 | 12:23 PM

PM Narendra Modi roadshow in mumbai: नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे शुक्रवारी १७ तारखेला एकाच व्यासपीठावर येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंनी या सभेचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत हिंदुत्वाचा अजेंडा आणि मराठी मतांचा टक्का यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शोला कोणकोणत्या नेत्यांची उपस्थिती, चर्चेतील हा नेता उपस्थित राहणार का?
नरेंद्र मोदी
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यासाठी नरेंद्र मोदी आज नाशिक अन् मुंबईत असणार आहे. नरेंद्र मोदी यांची कल्याण आणि नाशिकमध्ये सभा होणार आहे. तसेच घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. मोदी यांची दुपारी 3.15 वाजता नाशिकमधील दिंडोरीत सभा होणार आहे. त्यानंतर कल्याणमध्ये संध्याकाळी 5.15 वाजता सभा होईल. मुंबईत संध्याकाळी 6.45 वाजता रोड शो नरेंद्र मोदी करणार आहेत. रोड शोला त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. परंतु यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी यासंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

चंद्रशेखर बावनकुळे-राज ठाकरे भेट

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. तसेच महायुतीच्या उमेदवारासाठी सिंधुदुर्ग आणि पुण्यात सभाही राज ठाकरे यांनी घेतली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शो घेत आहेत. त्यामुळे या रोड शोला राज ठाकरे यांनीही उपस्थित राहावे, असे प्रयत्न महायुतीकडून केले जात आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेल्याचे वृत्त आहे. यावेळी आजचा रोड शो आणि १७ तारखेला होणाऱ्या सभेबाबत चर्चा झाली.

शुक्रवारी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे शुक्रवारी १७ तारखेला एकाच व्यासपीठावर येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंनी या सभेचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत हिंदुत्वाचा अजेंडा आणि मराठी मतांचा टक्का यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुंबईत शिवसेना ठाकरे गटांची मते मनसेच्या माध्यमातून महायुतीकडे कशा पद्धतीने वळवता येतील यावर सविस्तर चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. यामुळे प्रचारासाठी फक्त दोन दिवस राहिले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर १७ तारखेला राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात? हे देखील पाहणं गरजेचं आहे.