मुंबई, 30 ऑगस्ट 2023 : विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक उद्या मुंबईत होणार आहे. त्याआधी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या बैठकीतून ठाकरे-पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट इशारा दिलाय. या बैठकीसंदर्भात बोलताना ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, लोकं इंडियासोबत जुळत आहेत. उत्सुकता आहे. मुंबईत सरकार नसताना इंडियाची बैठक होत आहे. पुढील पंतप्रधान हे इंडिया अलायन्सचे राहणार आहेत. सिलिंडरचे रेड ४०० रुपये होते. तेव्हा पंतप्रधान छाती ठोकून सांगत होते. आता गेल्या नऊ वर्षात सिलेंडरचे रेट अकराशे रुपये झाले. आता जनतेच्या मागणीपुढे दोनशे रुपये सिलेंडरचे रेट कमी केले आहेत.
भाजपने बेशर्म होऊन सत्ता खेचली. डरफोक बनून सत्ता स्थापन केली. हिंमत असती तर निवडणुकी लढून सत्ता स्थापन केली असती. सर्वात भ्रष्टाचारी म्हणून पंतप्रधानांचा गळा सुकत होता. त्यावेळी ते अजित पवार यांचा नाव घेत होते. त्यांनाच सत्तेसाठी सोबत घेतले. कारण हे घाबरलेले लोकं आहेत. येणाऱ्या काळात हे लोकं घरी बसणार आहेत. कारण त्यांनी राज्यासोबत गद्दारी केली आहे, अशी टीकाही प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.
रोजगार नाही. महिला, शेतकऱ्यांचा सन्मान होत नाही. इंडिया अलायन्समध्ये परिवारवादाची चर्चा केली जाते. भाजपमध्ये किती परिवारवादातील लोकं आहेत, हे बघा नंतर इंडिया अलायन्सवर टीका करा, असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हंटलं. पीयूष गोयल, ज्योतिरादित्य शिंधीया, अनुराग ठाकूर हे कुठल्या तोंडाने परिवारवादाबद्दल बोलत आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यात परिवारवाद नाही का असा सवालही प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला.
जनतेने आमची सरकार बनवावं म्हणजे लोक सुटकेचा निश्वास टाकतील. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. युवकांना चांगली संधी आहे. काश्मीरमध्ये हिंदूंच्या समस्या आहेत. उत्तर प्रदेशात मुसलमानांनच्या समस्या आहेत. ही फार मोठी समस्या असल्याचंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हंटलं.