शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात या आहेत शक्यता ? कोणत्या मुद्यांवर असणार निकाल

| Updated on: Jan 09, 2024 | 9:38 AM

MLA Disqualification: शिवसेनासंदर्भात बुधवारचा दिवस महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे गट की उद्धव ठाकरे गट यापैकी कोणाचे आमदार अपात्र ठरणार? त्याचा निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी चार वाजता हा निकाल देणार आहे.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात या आहेत शक्यता ? कोणत्या मुद्यांवर असणार निकाल
Follow us on

मुंबई, दि. 9 जानेवारी 2024 | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकाल बुधवारी दुपारी चार वाजता येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. त्यांच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राहुल नार्वेकर यांनी १४ सप्टेंबर ते २० डिसेंबर दरम्यान मॅरेथॉन सुनावणी घेतली. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या आमदारांच्या बाजूने जोरदार युक्तीवाद केला होता. त्यानंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

या मुद्यांवर ठरणार निकाल

विश्वासदर्शक ठरवावेळी बजावलेला व्हिप आणि मतदानचा मुद्दा लक्षात घेऊन निकाल तयार करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर कोणाचा व्हिप पात्र ठरतो, ते लक्षात घेतले गेले आहे. दोन्ही गटाकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे तसेच साक्षीदारांची माहिती आणि वकिलांचा युक्तीवाद लक्षात घेऊन निकाल तयार केला आहे.

या असतील शक्यता

विधानसभा अध्यक्षांचा निकाल शिंदे गटाकडे असण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. परंतु ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास त्या गटाला सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होणार आहे. दुसरी शक्यता शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरण्याची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार अपात्र ठरु शकतात. त्यामुळे सरकार अस्थिर होऊ शकतो. तिसरी शक्यता कोणत्याही गटाचे आमदार अपात्र होणार नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या सहानभूतीची शक्यता मावळेल. परंतु कोर्टाच्या निर्णयानुसार दोन्ही पैकी एका गटाला अपात्र ठरवावेच लागणार असल्याचे मत तत्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव गटाकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

उद्धव गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे. कारण अध्यक्षांच्या निर्णयावर पुनर्विलोकन करता येते. यापूर्वी सर्वोच्च न्यायलयाने तसे दाखले दिले आहे. पक्षात फुट नाही आम्ही केवळ नेतृत्व बदल केला, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.