‘नाणार’साठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, अर्थबुद्धीने नव्हे सदसदविवेकबुद्धीने पाठिंबा: बाळा नांदगावकर

| Updated on: Mar 07, 2021 | 3:20 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतानाच हा प्रकल्प पूर्ण करण्याची गळ त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घातली आहे. (raj thackeray could meet cm uddhav thackeray for nanar refinery project, says bala nandgaonkar)

नाणारसाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, अर्थबुद्धीने नव्हे सदसदविवेकबुद्धीने पाठिंबा: बाळा नांदगावकर
बाळा नांदगावकर, मनसे नेते
Follow us on

मुंबई: नाणार प्रकल्पाला मनसेने सदसदविवकेबुद्धीने पाठिंबा दिला आहे, अर्थबुद्धीने नव्हे, असं सांगत नाणारसाठी वेळ पडल्यास राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू शकतात, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. (raj thackeray could meet cm uddhav thackeray for nanar refinery project, says bala nandgaonkar)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतानाच हा प्रकल्प पूर्ण करण्याची गळ त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घातली आहे. त्यावर बाळा नांदगावकर बोलत होते. राज ठाकरे यांनी कोकणात प्रत्यक्ष जाऊन तिथल्या आंदोलकांना पाठिंबा दिला होता. आता त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधायचा आहे. पर्यावरणाचा प्रदूषणाचा आणि निसर्गाचा समतोल साधून आपल्या लोकांना सुद्धा तिथला रोजगार कसा मिळेल? उद्योग कसा मिळेल? या सगळ्याची सांगड घालून हा प्रकल्प पाठिंबा देत आहोत, असं नांदगावकर म्हणाले. नाणारप्रकरणी राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याबाबत अजून काही ठरलेलं नाही. पण त्यांनी पत्रं लिहिलं आहे. परंतु वेळ पडल्यास ते मुख्यमंत्र्यांनाही भेटू शकतात, असं सांगतानाच राज यांचा कोकण दौराही अद्याप ठरलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रकल्पाबाबतच्या शंका दूर कराव्यात

या प्रकल्पाबाबतच्या शंकाकुशंका दूर केल्या पाहिजेत. किंबहुना तिकडे पर्यावरणवादी आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरणाबाबत त्यांच्या मनात शंका आहेत आणि म्हणून हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रच्या हिताचा आहे. कोरोनाच्या वेळेला अशा प्रकारचा प्रकल्प येत असेल तर तो प्रकल्प या राज्याच्या दृष्टीने फायद्याचा आहे. त्यामुळे राज्याची हानी होणार की तोटा होणार नाही यासाठी प्रकल्प हवा आहे.या अगोदर एक प्रकल्प बंगलोरला गेला होता. त्याच्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने सर्वस्पर्शी विचार करून हवा, असं नांदगावकर यांनी सांगितलं.

आंदोलकांना विश्वासात घ्या

या प्रकल्पाला ज्यांचा विरोध आहे त्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प होणे गरजेचे आहे. जेणेकरून कोकणाचं पर्यावरण, निसर्ग सौंदर्य, प्रदूषण या गोष्टीचा विचार करून हा प्रकल्प राबवला गेला पाहिजे, असं सांगतानाच शिवसेनेतही या प्रकल्पावरून दोन गट आहेत. संभ्रम आहे. स्थानिक आमदार राजन साळवी यांनी हा प्रकल्प व्हावा म्हणून त्यांची भूमिका माडंली होती, असंही ते म्हणाले. नाणारला आम्ही सुरुवातीला विरोध केला होता. परंतु, या राज्याची वास्तविक स्थिती पाहता महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या हितासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे. या प्रकल्पाचा आम्ही अर्थबुद्धीने विचार करत नाही. आमच्या सदसदविवेकबुद्धीला जे योग्य वाटलं म्हणून आम्ही भूमिका मांडली. मनसेने कुठल्याही प्रकारचा युटर्न घेतला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अयोध्येला जाणार

राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्यावरही नांदगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अयोध्या दौऱ्याबाबत उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा सुरू आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याला शंभर दिवस झाले आहेत. या संदर्भात चर्चा करूनच निर्णय घेऊ, असंही ते त्यांनी स्पष्ट केलं. (raj thackeray could meet cm uddhav thackeray for nanar refinery project, says bala nandgaonkar)

 

संबंधित बातम्या:

कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा युटर्न का?; वाचा सविस्तर

गोवा विधानसभा निवडणुकीत 20-25 जागांवर लढणार; संजय राऊत यांची घोषणा

आकडा फायनल झाल्यावर शिवसेनाही नाणारला पाठिंबा देईल; नितेश राणेंचा गंभीर आरोप

(raj thackeray could meet cm uddhav thackeray for nanar refinery project, says bala nandgaonkar)