राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र, मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या दहा वर्षांतला बॅकलॉग भरून काढतोय

| Updated on: Nov 02, 2022 | 10:39 PM

राजसाहेब आणि मी अनेकवेळा एकत्र येतोय. गेल्या दहा वर्षांतला बॅकलॉक भरून काढतोय, असंही शिंदे यांनी सांगितलं.

राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र, मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या दहा वर्षांतला बॅकलॉग भरून काढतोय
राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : वेडात मराठी वीर दौडले सात हा चित्रपट तयार केला जातोय. या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकत्र आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, सुपरहीट होईल. सुरुवातच जबरदस्त आहे. वेडात मराठी वीर दौडले सात या मराठी सिनेमाचा शुभारंभ याठिकाणी होतोय. महेश मांजरेकर हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. गेल्या काही काळात शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटांना प्रतिसाद मिळतो. शिवाजी राजे भोसले बोलतोय. काकस्पर्श असे चित्रपट महेश मांजरेकर यांनी काढलेत. अनेक संकटांवर मात करत यश मिळवलंय. या सिनेमात वीर मराठे आहेत. वेडेही आहेत. वेडेचे इतिहास घडवितात, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हीसुद्धा एक दौड लगावली. जनतेच्या मनातलं होत ते केलं. राजसाहेब आणि मी अनेकवेळा एकत्र येतोय. गेल्या दहा वर्षांतला बॅकलॉक भरून काढतोय, असंही शिंदे यांनी सांगितलं.

राज ठाकरे म्हणाले, वेडात मराठे वीर दौडले चाळीस याचे दिग्दर्शक, प्रोड्युसर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. वेडात मराठे वीर दौडले यातले महेश मांजरेकर हे निर्माते आहेत. ही गोष्ट पाच वर्षांपूर्वी महेश मांजरेकर यांनी सांगितली होती. प्रोड्युसर मिळाले. मोठा चित्रपट येत आहे. मराठी चित्रपट कात टाकतोय. याचं श्रेय महेश मांजरेकर यांना जातं. सात जण वेडात धावणारे आहेत. त्यांची ओळख यावेळी करून देण्यात आली.

या अक्षय कुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोल केलाय. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं अक्षय कुमार म्हणाले. हे खूप मोठं आव्हानात्मक काम असल्याचं अक्षय कुमार म्हणाले.