Raj Thackeray Speech: विधानसभेसाठी युती होणार का? मनसे किती जागा लढवणार…राज ठाकरे यांची मोठी घोषणा

| Updated on: Jul 25, 2024 | 1:34 PM

raj thackeray speech: येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या लोकांना सत्तेत बसवायचे आहे. ही गोष्टी घडणार म्हणजे घडणार आहे. आम्ही सर्वच जण त्यासाठी तयारीला लागलो आहोत. युती होणार की नाही? हा विचार तुम्ही करु नका. परंतु आपण २०० ते २२५ जागा लढवणार आहोत, असे राज ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.

Raj Thackeray Speech: विधानसभेसाठी युती होणार का? मनसे किती जागा लढवणार...राज ठाकरे यांची मोठी घोषणा
raj thackeray
Follow us on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग गुरुवारी फुंकले. पक्षाच्या बैठकीत त्यांनी महायुतीलाही घेरले. लोकसभेत महायुतीसोबत असलेल्या राज ठाकरे यांनी महायुतीची महत्वकांक्षी योजना लाडकी बहीणवर टीका केली. सरकारकडे देण्यासाठी पैसे आहेत का? असा थेट सवाल विचारला. त्याचवेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या लोकांना सत्तेत बसवायचे आहे. ही गोष्टी घडणार म्हणजे घडणार आहे. आम्ही सर्वच जण त्यासाठी तयारीला लागलो आहोत. युती होणार की नाही? हा विचार तुम्ही करु नका. परंतु आपण २०० ते २२५ जागा लढवणार आहोत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. १ ऑगस्टनंतर आपण राज्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवार कसा निवडणार, राज ठाकरे यांनी सांगितले

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीसाठी काय करावे, हे कार्यकर्त्यांना सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. हेच विधानसभा निवडणुकीचे तुमचे कँपेन असले पाहिजे. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचे लक्ष विचलीत करायचे आणि निवडणूका करायच्या हे काही कामात नाही.

तुम्ही मोठ्याने घोषणा दिली म्हणजे तुमची वर्णी लागेल, तुम्हाला विधानसभेची उमेदवारी मिळेल, असे समजू नका. सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. त्यासाठी एक टीम येईल, तुम्हाला फोन करेल. तुम्हाला बोलतील, तुमच्याशी चर्चा करतील. त्यानंतर माझ्याकडे सर्व्हे येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

१ ऑगस्टपासून राज्याचा दौरा

पावसापाण्याचा विचार करून १ ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू करतोय. मी राज्यात तालुक्यात जिल्ह्यात येईल. तिथे तुमची भेट होईल. तिथे कुणाच्या भेटी करायच्या आहेत,असं वाटतं त्यांच्याशी मी भेट घेईल. मेळावे घ्यावेत न घ्यावेत हे पाऊस पाहून ठरवू. पण तुमच्यासोबत बैठक घेणार आहे. ही माहिती देण्यासाठी मी तुम्हाला आज बोलावलं आहे. जे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष जे कोणी आले नसतील त्यांना टीम फोन करेल आणि कधी येणार हे सांगतील. एक दोन दिवसातच येतील. त्यानंतर तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा.