मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभा झाली. या सभेचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले. त्यांनी भाषणा दरम्यान व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या त्या बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यांच्या भाषणानंतर लागलीच ते बांधकाम पाडण्याचे आदेश निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी बांधकाम पाडण्यात आले. राज ठाकरे यांचा आक्रमकपणा व लोकप्रियतेमुळे दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेनेचं मुख्यालय असणाऱ्या दादरच्या शिवसेनाभवन समोर मनसेच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे या आशयाचा मजकूर होता. परंतु आता राज ठाकरे यांनी राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करावे, अशी मागणी पुढे आलीय.
कोणी केली मागणी
राज ठाकरे हिंदूचे एकमेव नेते आहेत. त्यांचे भाषण झाल्यानंतर कारवाईला सुरुवात केली. यामुळे शासनाचे मी आभार मानतो. कमीत कमी कोणाचा तरी दबाव प्रशासनावर आहे. यामुळे आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व न करता देशाचे नेतृत्व करावे, अशी मागणी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलीय.
हे प्रश्न आहेत
ज्ञानव्यापी मशीदचे अतिक्रमण आहे, मथुरा येथील कृष्ण मंदिराजवळ असणारी मशीद देखील अतिक्रमणच आहे. त्यांच्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. या ठिकाणी कारवाई व्हावी, यासाठी देशाचे नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडे द्यावे, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले. यावेळी प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांवरही टीका केली.
भोंग्याविरोधात आंदोलन करणारच
मशिदीवरील भोंग्याविरोधात आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे. त्यासाठी कितीही नोटीस आम्हाला बजावा, कारवाई करा, परंतु आम्ही थांबणार नाही. आमचा मुस्लीम धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही, मात्र अजाणसाठी स्पीकर वापरण्यास आमचा विरोध आहे, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे बी टीम नव्हे…
राज ठाकरे हे स्वतःची टीम आहे. ती बी टीम नाही. असे असेल तर ते शिवसेनेतून बाहेरच पडले नसते. शिवतीर्थावर अनेक जण चकरा मारतात की आम्हाला तुमच्या टीम मध्ये घ्या.
संजय राऊत संपलेले औषध
संजय राऊत हे एक्सपायरी डेट औषध आहे. संजय राऊत हे करमणूक आहेत. त्यांच्या विधानांचा जास्त विचार करण्याची गरज नाही, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर एकीकडे मोठी कारवाई दुसरीकडे राज विरोधात पोलिसात तक्रार..वाचा सविस्तर