Raj Thackeray : राज ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या पॅकेजची हवाच काढली; राज म्हणाले, मराठवाड्यात येऊन नुसती…

| Updated on: Sep 17, 2023 | 10:47 AM

राज्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनीही या दिनानिमित्ताने मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या पॅकेजची हवाच काढली; राज म्हणाले, मराठवाड्यात येऊन नुसती...
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 17 सप्टेंबर 2023 : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर काल संभाजीनगरमध्ये कॅबिनेटची बैठक पार पडली. तब्बल सात वर्षानंतर ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्य सरकारने मराठवाड्यावर आश्वासनांचा पाऊस पडला. तसेच मराठवाड्यासाठी 45 हजार कोटींची विकासकामे करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. सरकारच्या या पॅकेजवर विरोधकांकडून टीका होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पॅकेजची हवाच काढून टाकली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करताना फक्त ‘फोटो-ऑप’ म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे.

अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं याचा विचार करायचा नाही. हे सुरु राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

निर्धार करण्याचा दिवस

तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता. याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे, आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे, असंही राज यांनी म्हटलं आहे.

हा अखंतडतेसाठीचा लढा

आज 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा. कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असं राज ठाकरे म्हणाले.

धडा शिकवा

मी मागच्या वेळेस म्हणलं होतं तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या, असं आवाहन करतानाच राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील जनतेलामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

कालच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. 13 हजार 677 कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर.

अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार.

छत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना.

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1076 कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील 12 लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ.

हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय. 485 कोटी खर्चास मान्यता.

राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना 85 हजार रुपये दरमहा मानधन. 12.85कोटी खर्च.

सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार.

समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ.

राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय.

सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय.

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय.

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय.

परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार.

सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय.

नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय.

धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा.

जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. 10 कोटी मंजूर

गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबई येथे भूखंड देणार.

राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान राबविणार.

2005 पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि 2009 मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ.