मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिंडोशी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला. “निवडणुकीच्या सभांमध्ये कंटाळा येत आहे. पाच वर्षांत जे काही घडलं ते तुम्ही पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक चिन्ह गेले. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत खान राहिले आहेत. वर्सोव्यात हारून खान यांना तिकीट दिले आहे. उद्धव ठाकरेंचे उमेदवार उर्दू पत्रक काढते आहेत. मराठवाड्यात म्हण होती बाण की खान. उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला आहे. फक्त राहिला आहे तो म्हणजे खान. वर्सोवा उमेदवार हारून खान देण्यात आला. कडवट हिंदूत्व पासून ते कुठे गेले आहेत ? ते म्हणजे मुस्लिम उमेदवारापर्यंत गेली आहे. उर्दूमध्ये पत्र काढत आहेत”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलां.
“दादर येथे शिवाजीपार्क येथे दीप महोत्सव साजरा केला जातो. मात्र कालच तिथे मीटर काढून घेऊन गेले. कारण फक्त की 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सुरक्षेचे कारण देऊन काही करत असतो”, असं राज ठाकरे म्हणाले. “मुंबईत बांगलादेशी मुस्लिम आणि रोहिंग्यांची संख्या वाढत आहे. माझा मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. 48 तास दिले तर गुन्हे थांबतील”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
“दिवाळी आपला हिंदू सण आहे. सण सणासारखा साजरा करायचा नाही तर कशासारखा साजरा करायचा. दादरच्या शिवाजी पार्कात दरवर्षी तुळशीच्या लग्नापर्यंत लायटिंग असतो. दरवर्षाचा तो रिवाज आहे. या महाराष्ट्रात इथे दहीहंडीवर बंदी आणायला सुरुवात केली होती, गपणती मंडळांवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना उठली आणि हिंदूच्या सणावरती आलेली बंदी थांबली”, असं राज ठाकरे म्हणाले.
“आज तिथेच हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान येत आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही दिवाळीचे लाईट बंद करत आहात, म्हणजे कमालच झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी आले असते तर दिवा बंद करणं हे मी समजू शकतो. ज्यांच्या डेक्यातच प्रकाश पिटत त्यांनी त्यांच्यासाठी दिवे तरी कशाला दाखवा? उद्धव ठाकरेंची सभा असती तर मी समजू शकतो की, त्यांना ते लाईट चालत नाहीत. त्यांना हिंदूच्या लाईटचा डोळ्यांना त्रास होतो. आपण समजू शकतो. पण पंतप्रधान येणार असतील तर तुम्ही दिवे बंद करत आहात. कशासाठी बंद करत आहात? त्या गोष्टीची काय गरज आहे?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
“इतक्या सगळ्या बाबतीत इतका गोंधळ आणि भेसळ झालाय की कुणाचा पायपूस कोणात नाही. आज इतके विषय आहेत, आज एक नवीन गोष्ट झाली आहे की, बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्ये मोठ्या प्रमाणात मुंबईत शिरत आहेत. त्याचा रिपोर्ट असा आलेला आहे की, पुढच्या दहा वर्षात मुंबईतील हिंदू समाज 50 टक्क्यांच्या खाली येईल. हे इतकं प्रमाण वाढतंय. कारण या शहरात रोजच्या रोज कोण येतं कोण जातंय याचा पत्ता नाही”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.