Fact Check: राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्रं Fake? विधान परिषदेवरच्या नियुक्तीतले ती सहा नावं कोणती?

| Updated on: Apr 19, 2022 | 1:45 PM

Fact Check: राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. तब्बल वर्षभरानंतर राज्यापालांनीच सहा सदस्यांची नावे सूचवली आहेत.

Fact Check: राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्रं Fake? विधान परिषदेवरच्या नियुक्तीतले ती सहा नावं कोणती?
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्रं Fake?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. तब्बल वर्षभरानंतर राज्यापालांनीच सहा सदस्यांची नावे सूचवली आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून ही नावं सूचवली आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना जी नावे सूचवली आहेत. ते सर्वजण सामाजिक क्षेत्रातील आहेत. विशेष म्हणजे वर्षभरानंतर राज्यपालांकडून 12 सदस्यांच्या नियुक्तीवर राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. तसेच महाराष्ट्राच्या (maharashtra) इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांची वर्णी लावण्यासाठी स्वत:हून सहा नावे सूचवल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, राज्यपालांच्या नावाने व्हायरल होणारं हे पत्रं बनावट असल्याचं म्हटलं जात आहे. राजभवनातून या पत्राबाबतचा खुलासा करण्यात आला असून हे पत्रं बनावट असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कोणतीही नाव सूचवली नाही. ते पत्रं फेक आहे, असं राजभवनाने म्हटलं आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयातून त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

पत्रात नेमकं काय?

राज्यपाल कोश्यारी यांचं पत्र अचानक व्हायरल झालं. 12 आमदारांच्या नियुक्तीपूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात राज्यापालांनी सहा सदस्यांच्या नावांची शिफारस केली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडी बाबतचं हे पत्रं आहे. महाराष्ट्र विधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी ही नावे घ्यावीत असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील या सदस्यांचं योगदान पाहून त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या सहमतीने सदर नावाचा प्रस्ताव सादर करावा, असं पत्रात म्हटलं आहे.

कोणत्या सदस्यांची नावं सूचवली

वीरभद्रेश करबसप्पा बसवंती. (सामाजिक)

रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) (राजकीय)

सतीश रामचंद्र घरत (उद्योग )

संतोष अशोक नाथ, (सामाजिक)

मोरेश्वर महादू भोंडवे. (राजकीय)

जगन्नाथ शिवाजी पाटील. (सामाजिक)

ते पत्रं बनावटच

दरम्यान, राज्यपालांच्या नावाने व्हायरल होणारं हे पत्रं बनावट असल्याचं उघड झालं आहे. खुद्द राजभवनातून असं कोणतंही पत्रं राज्यपालांना पाठवलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यपालांनी कधीही मुख्यमंत्र्यांना असं पत्रं लिहिलेलं नाही. हे पत्रं म्हणजे कुणाचा तरी खोडसाळपणा आहे. या पत्रात काही तथ्य नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : राज ठाकरेंनी भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमनंतर पालघरमध्ये मनसैनिक आक्रमक

Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

Marathwada : 3 लाख क्विंटल हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, कृषी विभागानेच केली शेतकऱ्यांची अडचण..!