जगभर ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मुंबईत ओमिक्रॉनसाठी 250 बेड सज्ज; लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

| Updated on: Dec 08, 2021 | 9:01 PM

गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमिक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे. फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या 50 हजाराच्या आसपास आहे. ऑस्ट्रियामध्ये देखील कोविड सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज 7 हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.

जगभर ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मुंबईत ओमिक्रॉनसाठी 250 बेड सज्ज; लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ओमिक्रॉन
Follow us on

मुंबई : ओमिक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महाराष्ट्राने सध्या 12 कोटी 3 लाख 18 हजार 240 डोस दिले असून 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे. 18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85.25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे.

मुंबईत ओमिक्रॉनसाठी 250 बेड सज्ज

जगभरात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईतही परदेशातून आलेले ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने सेव्हन हिल रुग्णालयातील एक मजला राखीव ठेवला असून त्यातील 250 बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत.

मुंबई विमानतळावरच ओमिक्रॉनला रोखण्यासाठी पालिकेची जय्यत तयारी

विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत किंवा ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगळी व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेने अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालय सज्ज ठेवले आहे. या रुग्णालयातील एक मजला व त्यामधील 250 बेड्स कोरोना पॉझिटिव्ह तसेच ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या शिवाय ताडदेव येथील ब्रीच कॅडी आणि बॉम्बे रुग्णालयात प्रत्येकी दहा बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत. मुंबई विमानतळावर 10 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान हायरिस्क देशातून 4 हजार 845 प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत.

गेल्या 12 तासात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये 45 टक्के वाढ

गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमिक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे. फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या 50 हजाराच्या आसपास आहे. ऑस्ट्रियामध्ये देखील कोविड सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज 7 हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.

अमेरिकेत देखील नोव्हेंबर 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत गेल्या 2 आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे यावर भर देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Rapid distribution of Omicron worldwide, 250 beds ready for Omicron in Mumbai)

इतर बातम्या

‘संजय राऊतांचे खरे गुरु शरद पवारच’, त्या फोटोवरुन भातखळकरांचा टोला, राणे बंधुंचीही टीका; शिवसेनेचं उत्तर काय?

‘कोस्टल’च्या घोटाळ्यावरून स्थायी समितीत रणकंदन; भाजपने घाईघाईने 840 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्याचा डाव उधळला